थंडीच्या लाटेतही यंदा केळीच्या दरात दिलासा 

थंडीच्या लाटेतही यंदा केळीच्या दरात दिलासा 

रावेर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर भारतात थंडीची लाट व बर्फ पडत असल्यामुळे केळीची मागणी सध्या घटली आहे. तथापि, सध्या मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सव्वादोनशे रुपये क्विंटल अधिक असा दिलासादायक भाव केळीला मिळत आहे. सध्या रोज सुमारे 80 ट्रकद्वारे बाराशे टन केळी उत्तर भारतात पाठवली जात आहे. 

सध्या उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू कश्‍मीर या भागात बर्फ पडत आहे. यामुळे या भागात केळी पाठवली जात नाही. आठ दिवसांपूर्वी केळीचे भाव फरक मिळून तेराशे रुपये प्रतिक्विंटल मिळत होता. या वातावरणामुळे आता बाराशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. दररोज 70 ते 80 ट्रक केळी येथून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील काही भागात जातात. सुमारे एक कोटी रुपयांची बाराशे टन केळी सध्या पाठवली जात आहे. मागील वर्षी केळीला 900 रुपये फरक 10 असे फरक मिळून 960 रुपये क्विंटल भाव मिळत होता. यावर्षी रावेर 1090 फरक 20, चोपडा 1040 फरक 18, जळगाव 1050 फरक 18, बऱ्हाणपूर 731 ते अकराशे एक्कावन्न असा केळीला भाव मिळत आहे. 

मार्चनंतर बिकट स्थिती 
यावर्षी केवळ 71 टक्के पाऊस पडला आहे. भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन यावर्षी पावसाळा व त्यापूर्वी मृगबहार केलेल्या केळी लागवडीत सातपुडा पर्वत पायथा, मुंजलवाडी, कुसुंबा, अहिरवाडी, पाडळा, कर्जोद यासह तालुक्‍यातील काही भागांतील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन पाहून निम्मे केळी पीक ठेवून उर्वरित कापून फेकले आहे. त्याऐवजी गहू, हरभरा, मका आदीची पेरणी केली आहे. दरम्यान, मार्च ते मे या दरम्यान भूजल पातळीवर केळीची परिस्थिती अवलंबून राहणार आहे. 
 
उत्तर भारतात बर्फ व थंडीची लाट असल्यामुळे केळी केळीची मागणी घटली आहे. सफरचंद बाजारपेठेत अजूनही आहेत. संक्रांतीनंतर केळी भावात भावात आणखीन वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
- किशोर गनवाणी व्यापारी, महाराष्ट्र केला एजन्सी, रावेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com