जिल्ह्यातील 34 संशयितांचे अहवाल आले "निगेटिव्ह' 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

पाच दिवसानंतर यास सर्व संशयितांचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले होते. आज सर्वांचा अहवाल प्राप्त झाला असून, चाळीसगाव येथील सर्व संशयितांसह इतर 34 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

जळगाव : धुळे येथील "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चाळीसगाव येथील 6 जणांना "क्‍वारंटाइन' करण्यात आले होते. त्यांच्यासह इतर 34 संशयितांचा अहवाल "निगेटिव्ह' आल्याने प्रशासनासह सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र, सायंकाळी 45 वर्षीय पुरुष तर 60 वर्षीय महिला संशयिताचा मृत्यू झाला. या दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. 

हेपण वाचा - नंदुरबारमध्ये आढळला "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण 
 

राज्यात गेल्या काही दिवसांत "कोरोना'च्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चाळीसगाव येथील एक कुटुंबीय अंत्यविधीसाठी धुळे येथे गेले होते. याठिकाणी "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णाच्या संपर्कात हे कुटुंब आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या कुटुंबाला ताब्यात घेतले. त्यानंतर या कुटुंबाला शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात "क्‍वारंनाइन' करण्यात आले होते. दरम्यान, पाच दिवसानंतर यास सर्व संशयितांचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले होते. आज सर्वांचा अहवाल प्राप्त झाला असून, चाळीसगाव येथील सर्व संशयितांसह इतर 34 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

"निगेटिव्ह' अहवालाने दिलासा 
दिवसेंदिवस "कोरोना संशयित' रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात होती. यामध्येच धुळे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखील क्‍वारंटाइन करण्यात आले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या 30 वर्षीय युवकासह 75 वर्षीय वृद्धांचा अहवाल प्राप्त झाले असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

दोन संशयितांचा मृत्यू 
श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने शहरातील 45 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेस गेल्या दोन दिवसांपूर्वी "कोरोना' वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्या दोघांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. या दोघा संशयितांचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona 34 suspected negative report