corona fighter "कोरोना' घालविण्यासाठी रुग्णांची कुटुंबाप्रमाणे काळजी; अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

जळगावात त्यांच कुटुंबीय नसले, तरी रोज मोबाईलवरून संपर्क करून ते विचारपूस करतात. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ते कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेऊन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चौदा तासांपर्यंत अविरतपणे सेवा बजावत आहेत. 

जळगाव : "कोरोना विषाणूं'शी लढा पुकारण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभाग पूर्णपणे ताकदीने उतरला आहे. या विभागातील प्रत्येकजण आपापल्या परीने "कोरोना'शी "फाईट' करत आहे. मात्र, या लढाईत मुख्य भूमिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे बजावत आहेत. जळगावात त्यांच कुटुंबीय नसले, तरी रोज मोबाईलवरून संपर्क करून ते विचारपूस करतात. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ते कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेऊन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चौदा तासांपर्यंत अविरतपणे सेवा बजावत आहेत. 

नक्‍की वाचा - खानदेशातील कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह जळगावात

"कोरोना विषाणू'ने संपूर्ण जगात कहर केला आहे. "कोरोना'शी लढा पुकारण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या परीने प्रयत्नशील आहे. "कोरोना' जास्त पसरायला नको, याची खबरदारी म्हणून "लॉकडाउन' करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय तत्पर आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी, त्यानंतर संशयित वाटल्यास नमुने घेण्याचे काम दिवसभर सुरू असते. यावर नियंत्रण असलेले डॉ. खैरे रोज सकाळी आठलाच रुग्णालयात येऊन प्रथम ओपीडी कक्षाला भेट देतात, त्यानंतर अकराला जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून दुपारी दीडला "कोरोना'संदर्भात तीस ते चाळीस नर्सना प्रशिक्षण देत आहेत. हे काम नित्याचेच सुरू झाले आहे. यात रात्रीचे आठ-नऊ कधी वाजतात, हे कळतही नाही. 

परिवारासमवेत रोज चर्चा 
डॉ. खैरे जळगावात एकटेच आहेत. त्यांचा परिवार औरंगाबाद येथे आहे. "कोरोना'मुळे रविवारची सुटी असतानाही त्यांना सद्यःस्थितीत जाणे शक्‍य नाही. त्यामुळे रोज रात्री परिवारासमवेत मोबाईलवरूनच संपर्क करून चर्चा करीत आहेत. ज्याप्रमाणे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन करतात त्याप्रमाणेच परिवारालाही काळजी घेण्याचे आवाहन डॉ. खैरे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona fighter medical collage din bhaskar khaire