esakal | Video घरी जाण्याची ओढ मुंबई ते अलाहाबाद पायी प्रवास..पण घरात घेतील का माहित नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown travling

तरुणांनी नाइलाजास्तव अलाहाबादचा रस्ता धरला. गावी जाण्यासाठी पायीच सुमारे 1 हजार 400 किलोमीटरचा प्रवास करत हे तरुण आज दुपारी चारच्या सुमारास खोटेनगरजवळील महामार्गावरून जाताना दिसले. यावेळी त्यांनी आपली कैफियत मांडली.

Video घरी जाण्याची ओढ मुंबई ते अलाहाबाद पायी प्रवास..पण घरात घेतील का माहित नाही...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव  : ""लॉकडाउन'मुळे हातावर पोट असणाऱ्यांची वाताहत झाली आहे. हाताला काम नसल्याने पोटाची खळगी कशी भरावी, असा प्रश्‍न त्यांच्या समोर आहे. मुंबईत एका स्टील कंपनीत कामावर असलेल्या उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील तरुणांना कंपनीनेही वाऱ्यावर सोडले. त्यामुळे या तरुणांनी नाइलाजास्तव अलाहाबादचा रस्ता धरला. गावी जाण्यासाठी पायीच सुमारे 1 हजार 400 किलोमीटरचा प्रवास करत हे तरुण आज दुपारी चारच्या सुमारास खोटेनगरजवळील महामार्गावरून जाताना दिसले. यावेळी त्यांनी आपली कैफियत मांडली. 

मुंबई येथून एका स्टील कंपनीत कामाला असलेल्या दहा तरुणांनी दहा दिवस मुंबईहून पायी प्रवास करत धुळे शहर गाठले. तेथून त्यांनी सायकल दुकानदाराकडून नवीन सायकली विकत घेतल्या. रात्रंदिवस सायकल चालवून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघालेल्या तरुणांना आता मात्र आपल्या घरचा ओढा लागला आहे. 

आवर्जून वाचा - दुर्दैवी घटना : खेळत होता झोका...अन्‌ असे घडले भयंकर ! 

अन ढसाढसा रडले 
मुंबईतील कंपनी मालकाने कामगारांना वाऱ्यावर सोडले. हातमजुरी करणाऱ्या कामगारांजवळ पैसा नसल्याने एकवेळ भुकेल्यापोटी झोपण्याची वेळ आली होती. रोजगारच नसल्याने हातात पैसा येणार कुठून येणार. यामुळे भुकेल्यापोटी रात्र काढावी लागत असल्याची आपबिती प्रवास करणाऱ्या तरुणांनी करताना त्यांना रडू कोसळले. 

जिल्हा बंदी नावालाच 
मुंबई येथून दहा दिवसांपासून निघालेल्या उत्तर प्रदेशातील त्या दहा तरुणांची रस्त्यात महामार्गाने येत असताना मुंबईपासून जळगावपर्यंत कुठेही पोलिसांकडून विचारपूस अथवा तपासणी करण्यात आली नाही. यामुळे मात्र जिल्हाबंदी फक्त नावालाच केली गेली असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे.