त्या मयताच्या कुटूंबियांचे अहवाल निगेटिव्ह... 7 नवे संशयीत दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

मयताच्या कुटूंबियांसह तीन वर्षाच्या चिमुकलीचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. तसेच आज पुन्हा 7 कोरोनाचे संशयीत दाखल झाले असून त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

जळगाव : शहरातील सालारनगरातील साठ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याची घटना गेल्या दोन दिवसांपूर्वी घडली होती. या रुग्णाच्या कुटूंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्या सुमारे 17 जणांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त झाला असून त्या मयताच्या कुटूंबियांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच तीन वर्षाच्या चिमुकलीचा देखील अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने त्याच्या कुटूंबियांनी देखील सुटकेचा निश्‍वास सोडला. 

शहरात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली होती. दरम्यान या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 24 तासाच्या आत उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या कुटूंबियांसह त्याच्या संपर्कात असलेल्या 17 जणांचे नमूने धुळे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त झाला असून त्या मयताच्या कुटूंबियांसह तीन वर्षाच्या चिमुकलीचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. तसेच आज पुन्हा 7 कोरोनाचे संशयीत दाखल झाले असून त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

25 जणांचे अहवाल प्रलंबित 
जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे आज 7 संशयीत रुग्ण दाखल झाले असून आतापर्यंत संशयीतांची संख्या ही 123 इतकी झाली आहे. यापैकी 94 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 25 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती वैद्यककीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient Negatives report on the Mayan family