कोरोना वार्डातील संशयीत रुग्णाचा बळी; मयताला मधूमेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या संशयीत रुग्णांची संख्या वाढतच आहे. यातच कोरोनाच्या संशयीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढतच असून आज पून्हा कोरोनाच्या संशयीत रुग्णचा मृत्यू झाला आहे.

जळगाव : शहरातील 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्या महिलेला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील कोरोना वार्डात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्या महिलेवर उपचार सुरु असतांना त्यांचा आज सकाळी 10. 15 वाजेच्या सुमरास मृत्यू झाला. या महिलेचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. 

क्‍लिक करा - कोरोनाने बॅन्डवाल्यांचाच वाजविला बॅन्ड

शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या संशयीत रुग्णांची संख्या वाढतच आहे. यातच कोरोनाच्या संशयीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढतच असून आज पून्हा कोरोनाच्या संशयीत रुग्णचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 50 वर्षीय महिलेला कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने ती महिला उपचारासाठी ता. 8 रोजी शहरातील जिल्हा वैद्यकीय महाविद्यलयातील कोरोना वार्डात दाखल झाली होती. या महिलेवर उपचार सुरु असतांना त्या महिलेचा आज सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान या महिलेचे नमूने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप देखील प्रलंबित असून अहवाल आल्यानंतर त्या महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. 

मयताला मधूमेह, न्युमोनियाची व्याधी 
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल झालेल्या त्या 50 वर्षीय महिलेला न्युमोनिया, मधूमेह या व्याधी जडलेल्या होत्या. तसेच काही दिवसांपासून त्या महिलेला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले होते. 

संशयीत मयत रुग्णांची संख्या आठवर 
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाचे संशयीत रुग्ण म्हणून दाखल झालेल्यांमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा एक संशयीत महिलेचा मृत्यू झाला असून संशयीत मयत रुग्णांची संख्या आठवर पोहचली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona Suspected women dead today