esakal | कोरोनाने बॅन्डवाल्यांचाच वाजविला बॅन्ड
sakal

बोलून बातमी शोधा

band

खानदेशातील तीन ते साडेतीन हजार बॅन्डं चालकांना लाॅकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. पर्यायाने त्यावर अवलंबून असलेल्या 60 मजुरांची रोजदांरीवर कुर्हाड आली आहे. अनेकांनी कर्ज काढुन बॅन्ड पार्टी उभी केली त्यामुळे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न आमच्यासमोर आहे. शासनाने आमच्याबबातीत ही सकारात्मक विचार करून मदत द्यावी. 
-प्रदीप पाटील वायपुरकर जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्याध्यक्ष- महाराष्ट्र बॅन्डं कलाकार संघटना धुळे

कोरोनाने बॅन्डवाल्यांचाच वाजविला बॅन्ड

sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव : लाकडाऊनमुळे लग्नसोहळे लांबणीवर पडल्याने बॅन्डंवाल्याना मोठा फटका बसला आहे. खानदेशात साधारपणे 3 हजार बॅन्ड आहेत. त्यावरील 60 मजुरांवर अप्रत्यक्षरित्या त्यांचा परीणाम झाल्याचे चित्र आहे. एप्रिल व मे महिन्यात जवळपास 20 लग्नाच्या तारखा होत्या. त्यामुळे कोरोना ने बॅन्डं  वाजविणार्याचाच बॅन्डं वाजविल्याचे  म्हणत कर्ज काढुन मजुरांना दिलेले अॅडव्हांन्स व बॅन्डं उभारणीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न बॅन्डं मालकांकडून विचारला जात आहे. 

क्‍लिक करा - भुसावळला रेल्वे लोको शेडमध्ये ‘इन हाऊस निर्जंतुकीकरण’ मशिनची निर्मिती

जगात कोरोना ने थैमान घातले आहे. त्यामुळे उद्योखाची दररोज फीरणारे चाके बंद पडली आहेत. तर व्यवसायाचे ही शटर बंद झाले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या रोजगांरावर उपासमारिची वेळ आली आहे. तीच गत सध्या बॅन्डंचालकांची आणि त्यावर अवलंबून असलेल्या मुजरांची झाली आहे. 

बॅन्डंवाले झाले हतबल
कोरोना मुळे गर्दि टाळण्यासाठी 22 मार्चपासून लग्नसोहळे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे बॅन्डंवाल्याना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. बॅन्डंचे खर्या अर्थाने एप्रिल व मे महिना हे सिझन असते. यावर्षी या कालावधीत 20 लग्नाच्या तारखा होत्या. या कालावधीतच जास्त लग्न होत असतात. मात्र या सिझन च्या वेळेतच लाॅकडाऊन आल्याने ते हतबल झाले आहे. पुढे ही लाॅकडाऊन उठवण्याचे अजुन संकेत दिसत नाही. तर लाॅकडाऊन उठला तरी लग्नसोहळ्याना परवानगी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे बॅन्डंवाल्याचा व्यवसाय चौपट झाल्याचे चित्र आहे.  

खानदेशात 3 हजार बॅन्डं
खानदेशात बॅन्डंची मोठी परंपरा आहे.  येथील बॅन्डं राज्यात नावाजलेले आहेत. त्यांना राज्यभरातुन मागणी आहे. बॅन्डं कलाकार संघटनेच्या नुसार खानदेशात लहान मोठे तीन साडेतीन हजार बॅन्ड कार्यरत आहेत.  लग्नात बॅन्डंवाल्याची तीस हजारापासून ते दिड लाखापर्यंत सुपारी असते. एका बॅन्डंपार्टीत साधारपणे 15 ते 35 कलाकार काम काम करतात.  लाॅकडाऊनमुळे खानदेशातली जवळपास 60 हजारापेक्षा अधिक मजुर प्रभावीत झाले आहेत. 

बॅन्डंचालक आर्थिक विवंचनेत
लग्नाच्या घेतलेल्या तारखा रद्द झाल्याने बॅन्डंचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिझन सुरू होण्याअगोदर  वाद्य वाजविणार्या काही महत्वाच्या कलाकारांशी करार करून त्यांना अडव्हान्सं दिला जातो. तर बाजारात संगीताचे नवनविन तंत्रज्ञान पुढे येत असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी ते खरेदि करावे लागते. अनेकांनी कर्ज काढुन बॅन्डं उभा केला आहे. त्यामुळे बॅन्डंचे कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न बॅन्डंचालकांसमोर उभा राहीला आहे. त्यासाठी शासनाने सारासार विचार करून पुन्हा उभे राहण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी बॅन्डंचालकाकडुन  केली जात आहे.

मंगलकार्यालय ही पडले ओस
एप्रिल-मे महिन्यात मंगलकार्य फुल्ल असतात. मात्र यंदा लाॅकडाऊनमुळे लग्नसराईने कायम फुल्ल असणारे मंगलकार्यालय ओस पडली असल्याचे चित्र आहे. कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दि करता येणार नाही. त्यामुळे गर्दीच्या लग्नसोहळ्यावर बंदि घालण्यात आली आहे. यामुळे एप्रिल-मे महिन्यात लग्नासाठी करण्यात आलेले बँकिंग रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो मंगलकार्यचालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यानुशंगाने केटअर्स आदिंच्याही रोजगाराव कुर्हाड  पडली आहे. 

कर्ज काढून बॅन्डं उभा केला आहे. वर्षाच्या सुरवातीला काही कलाकरांशी करार करून अडव्हान्सं रक्कम ही दिली आहे. मात्र लाॅकडाऊन मुळे एप्रिल व मे मधे घेतलेल्या आर्डर रद्द झाल्या आहेत. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न माझ्यासमोर आहे. यासाठी शासनाने बॅन्डंवाल्याना मदत देणे आवश्यक आहे. 
-भूषण देवरे बॅन्डं मालक भडगाव 

माझ्या एप्रिल व मे मधील लग्नाच्या तारखा बुक होत्या. मात्र लाॅकडाऊन मुळे त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे पुढच्या वर्षी बॅन्डं कसा चालवायचा असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहीला आहे. शासनाने मदत करावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे. शासनाने आमच्याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार करावा.
-रविराज देवरे -बॅन्डंमालक भडगाव

loading image