esakal | "कोरोना' व्हायरसमूळे जमावबंदी... शरद पवारांचा दौरा स्थगित
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-

माजी जि.प.सदस्य संजय गरूड यांनी सांगितले, "कोरोना'व्हायरसचा धोका लक्षात घेवून दौरा स्थगित करण्यात आला आहे. दिल्ली येथून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यकांनी दुपारी दोन वाजता फोन करून दौरा स्थगित झाल्याचे आपणास सांगितले.

"कोरोना' व्हायरसमूळे जमावबंदी... शरद पवारांचा दौरा स्थगित

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : "कोरोना' व्हायरस आजार अधिक पसरू नये यासाठी शासनातर्फे दखल घेण्यात येत आहे. 50 किंवा त्या पेक्षा अधिक लोकांनी जमू नये, लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवार (ता.9) चा जळगाव दौरा स्थगित करण्यात आला आहे. 

क्‍लिक कराः  अमरीश पटेलांच्या राजीनाम्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर 
 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता.9) जळगाव दौरा आयोजित करण्यात आला होता. चांदसर (ता.धरणगाव)येथे शेतकरी मेळावा व माजी आमदार (कै.)मु.ग.पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. तर शेदुर्णी (ता.जामनेर)येथेही जाहिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.

आर्वजून पहा : भिडे वाड्यातील मुलींची पहिली शाळा विकसीत करा : आमदार स्मिता वाघ
 

देशात "कोरोना'व्हायरसचा धोका निर्माण झाल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांनीही दौरा स्थगितीला दुजोरा दिला आहे. शेंदुर्णी येथील कार्यक्रमाचे आयोजक माजी जि.प.सदस्य संजय गरूड यांनी सांगितले, "कोरोना'व्हायरसचा धोका लक्षात घेवून दौरा स्थगित करण्यात आला आहे. दिल्ली येथून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यकांनी दुपारी दोन वाजता फोन करून दौरा स्थगित झाल्याचे आपणास सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. याबाबत जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, कार्यक्रम रद्द करण्याचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. परंतु "कोरोना'व्हायरस लागण पसरण्याचा धोका लक्षात लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळायला हवेत. असे अवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजक निर्णय घेत आहेत. 

नक्की वाचा : जवानाची गोळी झाडून आत्महत्या 
 

loading image