video खायला कोठे मिळेल शोधत फिरला विदेश पाहुणा...पण लोकांनी बोलाविले पोलिसांना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

पदेशातून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. त्याचनुसार आज सकाळी दहाच्या सुमारास फ्रान्स येथून ज्युलीअन सर्च पेरी हा 31 वर्षीय युवक शहरात फिरत होता. दरम्यान तो युवक शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आला

जळगाव : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज एक दिवसीय जनता कर्फ्युची घोषणा केली होती. त्यानुसार आज सकाळी सात वाजेपासून शहरातील रस्ते सामसुम दिसून येत होते. याचवेळी शहरातील शिवाजी चौक पुतळ्याजवळ फ्रान्स येथील 31 वर्षीय ज्युलीअन सर्च पेरी हा युवक फिरतांना आढळून आला. यावेळी काही रोटरी ईस्टच्या सदस्यांनी या विदेशी पाहुण्याला रुग्णवाहिकेमध्ये टाकून त्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या विदेशी पाहुण्याची तपासणी करण्यात आली. 

नक्‍की वाचा - जनता कर्फ्यु : भुकेने व्याकुळ मनोरुग्णास दिले अन्न- पाणी

पदेशातून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. त्याचनुसार आज सकाळी दहाच्या सुमारास फ्रान्स येथून ज्युलीअन सर्च पेरी हा 31 वर्षीय युवक शहरात फिरत होता. दरम्यान तो युवक शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आला असता काही रोटरी ईस्टच्या सदस्यांनी त्याची विचारपुस करण्यास सुरुवात केली. यावेळी तो युवक फ्रान्स येथील असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रोटरीच्या सदस्यांनी त्या युवकाची तपासणी करण्यासाठी रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी या युवकाची तपासणी केल्यानंतर तो कोरोना व्हायरस निेगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्युलीअनची आस्तेवाईकपणे विचारपुस करुन त्याला जेवणही करु घातले. 

विना मास्क फिरत असल्याने आली शंका 
गेल्या काही दिवसांपासून फ्रान्स येथील युवक हा शहरात आला होता. दरम्यान आज संपूर्ण देशभरात कर्फ्यूृ असल्याने तो युवक शहरात विना मास्क घेवून फिरत होता. त्यामुळे काही नागरिकांना या विदेशी पाहुण्याबाबत शंका येवून त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. 

चार महिन्यांपासून आलाय विदेशी पाहुणा 
शहरात फीरत असलेला ज्युलीअन पेरी हा गेल्या चार महिन्यांपासून भारतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अजिंठा लेणी पाहण्यासाठी आला होता. दरम्यान आज त्याला दिल्ली येथे जाण्यासाठी तो शहरात आला होता. परंतु रेल्वेसेवा बंद असल्याने तो हॉटेलच्या शोधासाठी शहरात फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. 

जळगावकरांकडून मिळाली दुय्यम वागणुक 
दिल्ली जाण्यासाठी रेल्वे नसल्याने ज्युलीअन पेरी हा शहरात हॉटेलच्या शोधासाठी फिरत होता. विदेशीा पाहुणा शहरात बिनधास्त फिरत असल्याने काही हॉटेल चालकांनी त्याला लॉजींग देण्यास नकार दिला. त्यानंतर रस्त्याने हॉटेलच्या शोधात फरत असलेल्या या पाहुण्याला जळगावातील काही नागरिकांनी दुय्यम दर्जाची वागणुक दिल्याची प्रतिक्रीया त्याने यावेळी व्यक्त केली. 

रोटरी ईस्टने दिला मदतीचा हात 
रोटरी ईस्टतर्फे शहरात नारिकांना वैद्यकीय मदत व्हावी यासाठी स्टॉल लावण्यात आला आहे. दरम्यान विदेशी पाहुण्याची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्याला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातून डिक्‍सचार्ज मिळाला. परंतु राहण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने रोटरी ईस्टने पुढकार घेत पोलिसांच्या मदतीने त्या विदेशी पाहुण्याची व्यवस्था केली. तसेच हा विदेशी पाहुणा भुकेने व्याकुळ झालेला असता त्याला नाश्‍ता व जेवणाची सोय करीत विदेशी पाहुण्याचा करीत मदतीचा हात पुढे केला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus janta karfew in city search food