रस्ते दुरुस्तीला लागणार वर्षभर उशीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

जळगाव ः शहरात अमृत योजने अंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचे 46 टक्के काम झाले आहे. मात्र हे काम सुरू असताना रस्ते खोदले जात आहे. पूर्ण काम झाल्याशिवाय खराब रस्ते चांगले करता येणार नसल्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे वर्षभर तरी अजून शहरातील रस्ते दुरुस्त होणार नाही असे दिसत आहे. 

जळगाव ः शहरात अमृत योजने अंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचे 46 टक्के काम झाले आहे. मात्र हे काम सुरू असताना रस्ते खोदले जात आहे. पूर्ण काम झाल्याशिवाय खराब रस्ते चांगले करता येणार नसल्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे वर्षभर तरी अजून शहरातील रस्ते दुरुस्त होणार नाही असे दिसत आहे. 

शहरात केंद्र व राज्यशासनाकडून मंजूर अमृत योजने अंतर्गत जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर सुरू 
आहे. वाढीव वस्तीपासून सुरू झालेले काम आता महत्त्वाच्या वसाहतीपर्यंत आलेले आहे. त्यामुळे बरेचसे रस्ते खोदले गेले असल्याने खराब रस्त्यांचा त्रास हा नागरिकांना दररोज सहन करावा लागत आहे. मात्र अजून 64 टक्के काम बाकी असून नोव्हेंबर 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याचे सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यात अजून भूमिगत गटारी, मलनिस्सारण योजनेचे काम देखील होणार असल्याने शहरातील रस्त्यांचे कामे केव्हा सुरू होतील याबाबत अजून निश्‍चित नसल्याचे दिसून येते. 

दाट वस्तींमध्ये वाढणार अडचणी 
अमृतच्या नवीन जलवाहिनीचे कामे अजून विरळ वस्त्यांमध्ये सुरू आहे. पुढील कामे दाट वस्ती व लहान रस्त्यांमधून केले जाणार आहे. त्यामुळे रस्ते खोदण्यापासून, जलवाहिनी टाकणे, नळ कनेक्‍शन जोडणे आदी महत्त्वाचे कामात पुढे येणाऱ्या अडचणींना मक्तेदार व महापालिका प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे. 

रस्ते दुरुस्ती लांबणार 
जलवाहिनीचे काम सुरू असल्याने, भूमिगत गटारी व मलनिस्सारण कामांच्या निविदा प्रक्रियेला अडचणी आहेत. त्यामुळे हे कामे करताना अनेक रस्ते खोदले जाणार असल्याने रस्ते दुरुस्तीचे कामे किती लांबणीवर जातील हे अद्याप निश्‍चित नाही. नगरोत्थान निधीतून मिळालेल्या शंभर कोटीतून रस्त्यांची कामे केली जाणार आहे. परंतु या कामांना उशीर लागण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon corporation amrut ojna road repeiar