जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून कापूस खरेदी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे त्यांना कोणत्या दिवशी उपस्थित राहावे, याबाबतचा "मेसेज' पाठविला आहे.

जळगाव : महाराष्ट्र राज्य को.-ऑपरेटिव्ह ग्रोवर्स मार्केटिंग फेडरेशनतर्फे येत्या सोमवारपासून (27 एप्रिल) जिल्ह्यात पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे झोनल मॅनेजर आर. जी. होले यांनी आज "सकाळ'ला दिली. गेल्या दोन दिवसांपासून "सकाळ'मध्ये "व्यथा कापूस उत्पादकांची' अशी मालिका प्रसिद्ध होत होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. 

नक्की वाचा : जळगाव ब्रेकिंग : पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह, रेडझोनकडे वाटचाल

"कोरोना' संसर्गाच्या "लॉकडाउन' अगोदरही फेडरेशनतर्फे धरणगाव, पारोळा, कासोदा, दळवेल, अमळनेर, मालेगाव या ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र, "लॉकडाउन'मुळे ती बंद करण्यात आली. नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रे सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने येत्या सोमवारपासून (27 एप्रिल) धरणगाव, पारोळा, कासोदा, दळवेल, अमळनेर या ठिकाणी केंद्रे सुरू होतील. सर्वच ठिकाणी दररोज 25 ते 30 गाड्या कापूस खरेदी केला जाईल. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे त्यांना कोणत्या दिवशी उपस्थित राहावे, याबाबतचा "मेसेज' पाठविला आहे. ज्यांनी ऑफलाइन कपाशीची नोंदणी केली आहे त्यांनाही मेसेज पाठविला जाईल. 

आर्वजून पहा : ऐंशीवर्षीय "तरुणा'ची ऊर्जादायी दिनचर्या; रोज 25 किलोमीटर सायकलिंग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Cotton procurement starts from Monday in Jalgaon district