कापसाचे भाव स्थिरावले 

कापसाचे भाव स्थिरावले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जळगावः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असली, तरी परदेशात मागणी मंदावली आहे. टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीजने कापसाची खरेदी बंद केली. परिणामी जिल्ह्यातील कापसाचे भाव 5,600 रुपयांवर स्थिरावले. गेल्या आठवड्यापर्यंत व्यापारी कापसाला 5,800 चा भाव देत होते. मात्र, आगामी काळात कापसाच्या भावात तेजी येण्याबाबत साशंकता असल्याने काही शेतकरी 5,600 रुपये भावाने कापसाची विक्री करत आहेत. असे असले तरी 70 टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आहे. 

यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने कापूस उत्पादन कमी झाले. जे उत्पादन आले त्याला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापसाचा साठा केला. 5,500 रुपयांचा भाव असताना ते भाव 5,800 रुपयांपर्यंत गेले. तरीही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला मोठ्या प्रमाणात विक्रीस काढला नाही. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी कमी आहे. कापड इंडस्ट्रीजने मागील साठाच यंदा वापरण्याचे ठरविल्याने नवीन कापसाला मागणी हव्या त्या प्रमाणात होत नाही. कापसाचे उत्पादन कमी. चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. परिणामतः जिनिंग मिलमध्ये कापसाची आवक बंद झाली. यामुळे जिनिंग-प्रेसिंग मिल 80 टक्के बंद पडल्या आहेत. कापूस बाजारात होणाऱ्या उलाढालीवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिनिंग व्यवसाय मंदीत आला आहे. 

जिनिंग मिल बंद 
शासनाकडून कापसाला 5,400 रुपये भाव मिळाला. मात्र ती रक्कम लवकर मिळत नाही. खासगी व्यापाऱ्यांकडे 5,600 रुपये भाव मिळतो आहे. आगामी काळात कापसाच्या तेजीची शक्‍यता मावळली असल्याने शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस बाजारात विक्रीस काढला आहे. त्यातून ते आगामी हंगामाची तयारी करण्यावर भर देत आहे. 

संक्रांतीनंतर भाववाढीची शक्‍यता 
संक्रांतीनंतर कापसाच्या भावात वाढीची शक्‍यता आहे. ती वाढ शंभर- दोनशे रुपयांची असेल. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस बाजारात विक्रीस आणणे गरजेचे आहे, अशी माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी "सकाळ'ला दिली. 

Web Title: marathi news jalgaon cottone rate fix