भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार रावल यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

भाजप कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज घोषित केली आहे. खानदेशातील आठ जणांचा समावेश आहे. राज्याचे माजी पर्यटन मंत्री व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील आमदार जयकुमार रावल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघातील खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे : माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवड केली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजपची प्रदेश कार्यकारिणी शुक्रवारी (ता. 3) जाहीर केली. 
भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेश कार्यकरिणी आज जाहिर करण्यात आली. आमदार रावल वयाच्या 25 व्या वर्षी नगरसेवकपदापासून राजकारणाची सुरवात करणारे आमदार रावल पूर्वी "भाजयुमो'चे राष्ट्रीय महामंत्री होते. त्या वेळी त्यांच्याकडे कर्नाटक आणि राजस्थानची जबाबदारी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकारिणीतही आमदार रावल महामंत्री होते. धुळे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ते 2004 पासून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. गत भाजपप्रणीत राज्य सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजनेच्या खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद होते. 

खानदेशातून आठ जणांचा समावेश 
भाजप कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज घोषित केली आहे. खानदेशातील आठ जणांचा समावेश आहे. राज्याचे माजी पर्यटन मंत्री व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील आमदार जयकुमार रावल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघातील खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश समिती सदस्यात माधुरी बोरसे (धुळे), जयश्री अहिरराव (धुळे), बबन चौधरी (धुळे) माजी आमदार स्मिता वाघ (जळगाव ), राजेंद्र गावित (नंदुरबार) अशोक कांडेलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायम विशेष निमंत्रीत सदस्यात, माजी मंत्री एकनाथराव खडसे,(जळगाव), आमदार गिरीश महाजन (जामनेर), खासदार डॉ. सुभाष भामरे (धुळे), आमदार डॉ..विजयकुमार गावित (नंदुरबार) या नेत्यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon dhule bjp State Vice President jaykumar raval