esakal | "दीपस्तंभ'चे यजुर्वेंद्र महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील तीन पुरस्कार 

बोलून बातमी शोधा

yajuwendra mahajan

दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक महाजन यांची सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर गार्डन जवळ, वानवडी, पुणे येथे दोनला मार्चला सायंकाळी साडेपाचला हा पुरस्कार देण्यात येईल. 

"दीपस्तंभ'चे यजुर्वेंद्र महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील तीन पुरस्कार 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जळगाव व पुणे येथील दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल संस्थेचे संस्थापक यजूर्वेंद्र महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील तीन पुरस्कार जाहीर झाले आहे. 29 फेब्रुवारी, दोन व आठ मार्च अशा तीन दिवशी विविविविध संस्थांतर्फे त्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. 

"दादा गुजर पुरस्कार' ः ज्येष्ठ समाजसेवक डॉक्‍टर स्व. सि. तु. गुजर ऊर्फ (दादासाहेब) यांनी आरोग्य शिक्षण व ग्रामीण आदिवासी विकासात कार्य केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना/संस्थांना महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे सन्मानित केले जाते. 
दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक महाजन यांची सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर गार्डन जवळ, वानवडी, पुणे येथे दोनला मार्चला सायंकाळी साडेपाचला हा पुरस्कार देण्यात येईल. 

आर्वजून पहा : पाण्यावर तरंगणारी चप्पल दिसली...अन्‌ गावावर शोककळाच पसरली ! 
 

"समाज मित्र पुरस्कार" ः डोंबिवली नागरी सहकारी बॅंक अग्रगण्य शेड्यूल सहकारी बॅंक आहे. बॅंकेने भागधारक कल्याणी निधीची उभारणी केली असून या निधीच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल, वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना समाज मित्र पुरस्कार दिला जातो. यानिमित्त या वर्षाचा सामाजिक समाजमित्र पुरस्कार श्री. यजुर्वेंद्र महाजन यांना जाहीर करण्यात आला. सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे 29 फेब्रुवारीस सायंकाळी सहाला पुरस्कार वितरण होईल. 

नक्की वाचा : मेहरुण तलाव परिसरात हजार वृक्षांची वनराई 
 

"आदर्श दिव्यांग मित्र पुरस्कार' ः लातूर येथील आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे दरवर्षी राज्यातील विविध 9 क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना "आदर्श नवरत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सामाजिक क्षेत्रातील "राज्यस्तरीय आदर्श दिव्यांग मित्र' पुरस्कार यजुर्वेंद्र महाजन यांना जाहीर करण्यात आला. दयानंद सभागृह, लातूर येथे आठ मार्चला सायंकाळी पाचला पुरस्कार वितरण होईल. मित्र परिवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, उपस्थितीबाबत निश्‍चित कळवावे, असे आवाहन श्री.महाजन यांनी कळविले आहे. 

क्‍लिक कराः  सोने 72 तासांमध्ये 1700 रुपयांनी वधारले