जिल्हा सीमा बंदी उल्लंघन रोखण्यासाठी  विशेष पथकांची नियुक्ती - निवासी उपजिल्हाधिकारी कदम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेले आदेश, सूचनांचे पालन व अंमलबजावणी करण्यासासंदर्भात त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. 

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा सीमा बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जिल्हा सीमा उल्लंघन होण्याची शक्‍यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याच्या हेतूने उपविभागीय दंडाधिकारी तसेच तालुका दंडाधिकारी यांना जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांचे पथक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी दिली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, तसेच उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. 

राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेले आदेश, सूचनांचे पालन व अंमलबजावणी करण्यासासंदर्भात त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. 

आर्वजून पहा ः भाषण नको, रेशन पाहिजे, वेतन पाहिजे... "सीटू'तर्फे आंदोलन

जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध (सीमाबंदी) करणेसाठी आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले आहेत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिस प्रशासन यांच्या पथकाद्वारे कार्यवाही सुरू आहे. सीमाबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon disctrct border lock special scot