esakal | भाषण नको, रेशन पाहिजे, वेतन पाहिजे... "सीटू'तर्फे आंदोलन

बोलून बातमी शोधा

भाषण नको, रेशन पाहिजे, वेतन पाहिजे... "सीटू'तर्फे आंदोलन

. देशभरात आम्ही निषेध करीत आहोत. जिल्ह्यात विविध ठिकाणही आंदोलन करण्यात आल्याची माहिती सीटू'चे कॉम्रेड विजय पवार यांनी दिली. 

भाषण नको, रेशन पाहिजे, वेतन पाहिजे... "सीटू'तर्फे आंदोलन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : "भाषण नको, रेशन पाहिजे, वेतन पाहिजे' अशा घोषणा देत आज येथील "सीटू' संघटनेतर्फे कामगारांनी घोषणा दिल्या. राज्य शासनाने बांधकाम कामगारांना दोन हजारांची मदत दिली. मात्र ती तुटपुंजी मदत आहे. दिल्ली, केरळ राज्यात पाच ते सात हजारांची मदत बांधकाम कामगारांना दिली पाहिजे. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

आर्वजून पहा :अरे... दारूच्या धंद्यात चक्क  "पीआय'चे हात "ओले' 
 

बांधकाम कामगारांना रेशनकार्डावर रेशन मिळत नाही. लॉकडाऊन असल्याने बांधकामे बंद आहे. हाताला काम नाही. रेशन, वेतनही नाही. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम कामगारांना 

क्‍लिक कराः काम करण्यास परवानगी द्या..मिस्तरी, फर्निचरचे कारागीर घरी बसून 

कामगारांवर अन्याय सहन करणार नाही 
सरकार खात्यात कामगार केल्याचे दहा हजार कोटीपेक्षा अधिक पैसे जमा आहे. "सीटू'तर्फे शासनाला मागणी केली होती की प्रत्येक कामगाराच्या खात्यावर पंधरा हजार रुपये टाका. परंतु शासनाने कोणाला दिले, कोणाला दिले नाही. धान्याबाबतही तेच घडले आहे. पंधरा हजाराऐवजी दोन हजारांची तुटपुंजी मदत शासनाने दिली. ही मदत निषेधाचा हक्क राखून ही मदत घेत आहे. केरळ राज्याने सहा हजार, दिल्लीने पाच हजारांची मदत दिली. महाराष्ट्र शासनाकडे कामगार खात्यात जादा पैसे असताना अधिकची मदत केली पाहिजे. बंदमुळे कामगारांना कपात होईल, आठ तासांऐवजी बारा तासाची ड्यूटी करावी लागेल. अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. देशभरात आम्ही निषेध करीत आहोत. जिल्ह्यात विविध ठिकाणही आंदोलन करण्यात आल्याची माहिती सीटू'चे कॉम्रेड विजय पवार यांनी दिली. 


या दिल्या घोषणा.. 
बंद काळात रेशन धान्य मिळत नाही. कोण म्हणते देत नाही. घेतल्या शिवाय राहणार नाही. भाषण नको, रेशन व वेतन पाहिजे, कामगार एकजुटीचा विजय असो. महिला एकजुटीचा विजय असो, बंद काळातील पगार मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. सीटू संघटनेचा विजय असो..विजय असो... अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

नक्की वाचा :  साथीच्या आजाराच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवा : महापौर भारती सोनवणे