esakal | जिल्ह्यात 78 "कोविड केअर सेंटर' - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण 

बोलून बातमी शोधा

photo

जळगाव ः "कोरोना'ला रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन व उपचारार्थ जिल्ह्यात अत्यावश्‍यक उपकरणांसह 11 हजार 243 बेड तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्यात 78 "कोविड केअर सेंटर' - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः "कोरोना'ला रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन व उपचारार्थ जिल्ह्यात अत्यावश्‍यक उपकरणांसह 11 हजार 243 बेड तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

जळगावच्या  तहसीलदार हिंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले - प्रभारीपदी संचेती

जिल्ह्यात "कोरोना' विषाणूंमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्रिस्तरीय उपचारपद्धती अवलंबून त्यानुसार आवश्‍यक ती तयारी ठेवण्याच्या सूचना शासनामार्फत प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांना अशा परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा नियोजन समितीतर्फे जिल्हा रुग्णालयाला आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 78 "कोविड केअर सेंटर' सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये नऊ हजार 142 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात 23 "कोविड हेल्थ सेंटर' स्थापन करण्यात आले आहेत. त्यात एक हजार 41 बेड उपलब्ध आहेत. "कोविड हॉस्पिटल'चे 10 युनिट आहेत. त्यात एक हजार 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे आवश्‍यक वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा उपलब्ध आहे. 

विरोधी पक्षनेते फडणवीस राजभवनातच जास्त दिसतात - गृहमंत्री देशमुख यांची टीका 
तालुकास्तरावर समिती 
तालुकास्तरावर "कोविड केअर सेंटर'मार्फत रुग्णांना चांगले उपचार व व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी व्यवस्थापन समिती नेमण्यात आली आहे. "कोविड केअर सेंटर' समितीत तालुकास्तरावर तहसीलदार अध्यक्ष, तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक, महिला व बालविकास अधिकारी सदस्य आहेत. वैद्यकीय अधीक्षक सदस्य सचिव आहेत. 

सेंटरमध्येच "स्वॅब' घेतले जाणार 
या सेंटरमध्ये सौम्य स्वरूपाच्या आजारांचे रुग्ण दाखल करण्यात येणार असून, त्यांचे "स्वॅब'ही तेथे घेतले जाणार आहेत. यामुळे रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. रुग्ण जेथे असेल तेथील "कोविड केअर सेंटर'मध्येच त्यास सेवा पुरविण्यात येतील. तेथे शासनाने नेमून दिलेले कम्युनिटी मेडिकल ऑफिसर, तसेच आरबीएसके, आयुष्य, सीएचओ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, एएनएम, औषध निर्माता व सफाई कर्मचारी, वाहनचालक, लॅब टेक्‍निशियन हे 24 तास शिफ्ट ड्यूटीमध्ये कार्यरत असतील. 

नक्की वाचा ः अरे हे काय..एकाच आठवडयात भाजप नगरसेवकाने केले दोन प्रताप 
 

फिव्हर क्‍लिनिक सुरू 
रुग्णांसाठी बेड, गाद्या, उशीसह वीज, इतर सुविधा मुबलक स्वरूपात उपलब्ध असतील. पालिकेतर्फे पाणी व साफसफाईची सुविधा होईल. महसूल खात्यातर्फे रुग्णांना जेवणाची सुविधा करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये फिव्हर क्‍लिनिकची सुरवात करण्यात आली आहे. यात सौम्य स्वरूपाचा ताप, सर्दी, खोकला यावर उपचार केले जातील. गरज असल्यास रुग्णांना दाखलही करून घेण्यात येईल. ज्या रुग्णांना गंभीर किंवा अतिगंभीर लक्षणे आढळतील, अशा रुग्णास योग्य त्या उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल केले जाईल.