esakal | अरे हे काय...एकाच आठवड्यात भाजप नगरसेवकाने केले दोन प्रताप ..वाचा सविस्तर !
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पोलिस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. निरीक्षक बळीराम हिरे यांनी संशयीतांना घटनास्थळावर नेऊन सखोल चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षकांना कालच सोपवला होता.

अरे हे काय...एकाच आठवड्यात भाजप नगरसेवकाने केले दोन प्रताप ..वाचा सविस्तर !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : मोहाडी(ता.जामनेर) शिवारात गेल्या बुधवारी विदेशी दारुसह वाळूमाफियांसोबत सचित्र जुगाराचा डाव आणि पेग रिचवतांना भाजप नगरसेवक कुलभुषण पाटिल चमकले होते. या घटनेत जाबजबाव होवून गुन्हा दाखल होणार त्या अगोदरच दारु-जुगाराचा पुन्हा एक डाव नगरसेवक कुलभुषण पाटिल यांच्या निर्माणाधीन घरातच मांडण्यात आला होता. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने छापा टाकून बारा संशयीतांना 2 लाख71 हजार 475 रुपयांच्या रोकड व जुगाराच्या साधनांसह अटक केली आहे.

नक्की वाचा : संचारबंदीचे नियम कडक करावेत : अतिरिक्त आयकर आयुक्त साळुंखे 
 

शहरातील मयुर कॉलनीत भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरात जुगार अड्डा चालवला जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांना मिळाली होती. मध्यरात्रीपुर्वी पावणे बारा वाजता किरण धमके सुनील पाटील, राजेश चौधरी रवींद्र मोतीराया, अशोक फुसे सचिन साळुंके, विनयकुमार देसले व पंकज शिंदे यांच्या पथकासह श्री.रोहन यांनी छापा टाकला असता नगरसेवक कुलभुषण पाटिल यांच्यासह संतोष भगवान बारी(मरीमात मंदिर पिंप्राळा), रुघुनाथ देविसींग पाटील(वय-45), समाधान पंढरीनाथ चौधरी(वय-30), पंकज सुरेश पाटील(वय-30), सचिन रघुनाथ पाटील(वय-26), नीलेश लोटन कोळी(वय-30 मयुर कॉलनी), धिरज विजय पाटील(वय-45, गुजराल पेट्रोलपंप), राजेंद्र भिका भोई (वय-30), मंगेश लक्ष्मण पाटील(वय-27,मयुर कॉलनी), पंकज विरभान पाटील(वय-30), कुणाल शाम रामसे(वय-20) व अनिल सुरेश गव्हाळे(वय-44) अशा जुगारींना रोकड आणि जुगाराच्या साधनांसह 2 लाख 71 हजार 475 रुपयांच्या ऐवज सह अटक करण्यात येवुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

क्‍लिक कराः विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर नियुक्‍त्या 
 

शेतातुन अड्डा आला घरात 
मोहाडी (ता.जामनेर) येथील , एका शेतात बुधवार (ता.22) रोजी ब्रॅण्डेड विदेशी दारु, मटणासह जुगाराची जंगी पार्टि आयोजीत करण्यात आली होती. त्यात भाजपनगरसेवक कुलभुषण पाटिल, पोलिस कर्मचारी विनोद चौधरी याच्यासह 9-10 वाळू व्यवसायीकांचे फोटो सोशल मिडीयावरुन व्हायरल झाल्याने या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. निरीक्षक बळीराम हिरे यांनी संशयीतांना घटनास्थळावर नेऊन सखोल चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षकांना कालच सोपवला होता. यावर कारवाई होणार इतक्‍यात कालच मध्यरात्री मयुर कॉलनीतील कुलभुषण पाटिल यांच्या निर्माणाधीन घराच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात येवुन अटक करुन गुन्हा दाखल झाला. 

 नक्की वाचा  त्या' कोरोनाबाधिताने दिला खोटा पत्ता 
 

loading image