कर्जमुक्तीचे दोन लाख शेतकऱ्यांची माहिती "अपलोड' 

कर्जमुक्तीचे दोन लाख शेतकऱ्यांची माहिती "अपलोड' 

ळगाव : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्याचे काम 89 टक्‍के झाले आहे. सुमारे दोन लाख शेतकऱ्यांची माहिती "अपलोड' करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीस जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलाठी, तहसीलदार, स्वस्त धान्य दुकानदार आदींना या योजनेच्या प्रमाणीकरणाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 29 फेब्रुवारीनंतर प्रत्यक्ष योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्‍यता आहे. 
जिल्हा बॅंकेचे एक लाख 58 हजार 59 शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत बॅंकेचे 21 हजार 597 शेतकऱ्यांची माहिती राज्य शासनाच्या कर्जमुक्‍ती योजनेच्या पोर्टलवर "अपलोड' करण्यात आली आहे. 21 हजार 111 शेतकऱ्यांची नावे "अपलोड' करण्याचे बाकी आहे. 
 
प्रशिक्षण महत्त्वाचे 
योजनेच्या शेतकऱ्यांकडून प्रमाणीकरण करण्यासाठी थंब इंप्रेशनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी गावपातळीपासून तालुका, शहर पातळीवर यंत्रे देण्यात येतील. ती कशी हाताळावीत, शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण कसे करावे याबाबत 21 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण होणार आहे. यात तलाठी, तहसीलदार, स्वस्त धान्य दुकानदार, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी आदींना हे प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांची "अपलोड' झालेली माहिती बरोबर आहे किंवा नाही, याचे प्रमाणीकरण केले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com