मोबाईल, घरी शौचालय आहे का? 34 मुद्यांवर मेपासून जनगणना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

लॅपटॉप आहे का ? कोणते वाहन वापरता आदींची माहिती काही मिनिटात ऍपवर भरली जाणार आहे. 1 मे ते 15 जून दरम्यान या गणना होणार आहे. घराची गणना करताना घर कच्चे आहे की पक्के आहे? याची माहिती घेतली जाईल 

जळगाव : जिल्ह्यात जनगणनेस (खानेसुमारी) मे महिन्यात सुरू होणार आहे. एकूण 34 मुद्यांवर होणाऱ्या जनगणनेत मोबाईल, एलईडी टीव्ही, वाहन आहे का ?, घरी शौचालय आहे का ? याची प्रथमतः माहिती घेतली जाणार आहे. जनगणना व घरयादी, घरगणना असा दोन गणना एकावेळी होणार आहे. 

क्‍लिक करा - टॉयलेटमध्ये स्वतःच केली प्रसुती...बाळाला बादलीत सोडून रूममध्ये येवून झोपली 

जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी मुंबई येथील जनगणना कार्यालयातील उपसंचालक रमेश भोसले, जनगणना अधिकारी हरीश जाधव, हितेश मिस्तरी यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पालिकांचे मुख्याधिकारी यांना प्रशिक्षण दिले. भूसंपादन अधिकारी किरण पाटील, विकास साताळकर, उपायुक्त अजित मुठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे यांची मास्टर ट्रेनर्स म्हणून निवड झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम उपस्थित होते. लवकरच जिल्हातील नेमावयाच्या प्रगणकांना प्रशिक्षण देतील. 

हेही पहा - ‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्‍या विदेशी नोटा 
 
ऍपद्वारे जनगणना 
जनगणना व घरयादी, घरगणना अशा दोन प्रकारे जनगणना होणार आहे. त्यासाठी ऍप विकसित करण्यात आले आहे. यात कोणत्याही प्रकारचा पुरावा मागितला जाणार नाही. नाव, पत्त्यानंतर मोबाईल आहे का ? घरी शौचालय आहे का ? वापरता का ? लॅपटॉप आहे का ? कोणते वाहन वापरता आदींची माहिती काही मिनिटात ऍपवर भरली जाणार आहे. 1 मे ते 15 जून दरम्यान या गणना होणार आहे. घराची गणना करताना घर कच्चे आहे की पक्के आहे? याची माहिती घेतली जाईल 
 
1872 मध्ये पहिली जनगणना झाली होती 
जनगणना ही भारताची समृद्धी परंपरा आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ जनगणनांमधील एक मानली जाते. भारतात पहिली जनगणना 1872 मध्ये झाली. ही देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी झाली. 1881 मध्ये संपूर्ण देशात एकाच वेळी जनगणना करण्यात आली. तेव्हा पासून अखंडपणे प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना केली जाते. ही जनगणना 1872 नंतरच्या अखंड मालिकेतील 16 वी व स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district may mounth Census mobile and toilet