esakal | ‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्‍या विदेशी नोटा 
sakal

बोलून बातमी शोधा

Begging railway

मयत इंदलसिंग ठाकूरच्या पिशवीत मिळून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे आम्ही तपास सुरु केला आहे. बँकेतील त्यांची रक्कम त्‍यांच्या योग्य त्‍या वारसदाराची शहानिशा करून त्यांना त्यांच्या स्वाधीन केली जाईल. तपासादरम्यान जो कोणी वारसदार असेल तो पुढे येईलच. 
- विजयकूमार ठाकूरवाड, पोलिस निरिक्षक, चाळीसगाव 

‘त्या’ भिकाऱ्याच्या थैलीत आढळल्‍या विदेशी नोटा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : रेल्‍वेमध्ये प्रवाशांच्या डब्यांमध्ये स्‍वच्‍छता करून भीक मागत उदरनिर्वाह करणाऱ्या येथील भिकाऱ्याच्या थैलीत त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांसह बँकेतील ठेवीच्या पावत्या, पासबुक, आधारकार्डसह नेपाळ आणि कतार देशातील नोटा मिळून आल्या. विशेष म्हणजे, या भिकाऱ्याने त्याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह देशातील अनेक बड्या नेत्यांना पत्र पाठवली आहेत. थैलीत मिळालेला हा सर्व दस्तावेज पाहून पोलिसही अवाक झाले. 

क्‍लिक करा - टॉयलेटमध्ये स्वतःच केली प्रसुती...बाळाला बादलीत सोडून रूममध्ये येवून झोपली 


शहरातील हनुमानवाडी येथील रहिवासी इंदलसिंग ठाकूर (वय ५२) हा भुसावळ ते चाळीसगाव प्रवासादम्‍यान रेल्वेच्या डब्यांमध्ये स्‍वच्‍छता करून प्रवाशांकडे भीक मागायचा. रेल्वेत स्वच्छता करताना तो देश, विदेशातील ऐतिहासिक माहिती देऊन तसेच चालू घडामोडीवर भाष्य करून प्रवाशांचे मनोरंजनही करायचा. त्यामुळे रेल्वेत दररोज अप- डाऊन करणारे प्रवाशी त्याच्या चांगल्या ओळखीचे झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावल्‍याने त्याला उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २९ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास उपचारादरम्‍यान त्याचा मृत्यू झाला. 

अडीच हजार रूपयांनी भाड्याची रूम 
रेल्वेत भिक मागून रात्री कुठे रेल्वे प्लॅटफॉमवर झोपत नसे; तर राहण्यासाठी त्याने भाड्याची खोली केली होती. तो दिवसभर हेच काम करून येथील भाड्याच्‍या खोलीत राहायचा. विशेष म्हणजे, ही खोली त्याने प्रतिमहिना अडीच हजार रुपयाने भाड्याने घेतली होती. आपल्या घरमालकाला दर महिन्याला न चुकता घरभाडे द्यायचा.

अन्‌ थैलीत आढळले असे काही 
चाळीसगावचा रहिवासी असल्याने त्याच्या मृत्यूची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरात पाहणी केली असता, इंदलसिंगची एक पिशवी पोलिसांना मिळून आली. ज्यात स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे पासबुक, पोस्‍टातील आर. डी.च्‍या पावत्या, आधारकार्ड, शाळेचा दाखला, जामनेर तालुक्यातील जन्म दाखला व पॅन कार्ड देखील मिळून आले. इंदलसिंगच्या बँक खात्यात तब्‍बल बारा लाख रूपये आहेत. मिळालेल्या कागदपत्रांवरुन तो तिसरीपर्यंत शिकल्याचे लक्षात येते. पिशवीत मिळून आलेल्या एक व दोन रुपयांच्या नोटांसोबत नेपाळ देशातील पाच रूपयांच्या दोन नाटा तसेच मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील कतार देशातील दहा रूपयांची नोट मिळून आली. या नोटाला त्याला प्रवाशांनी भीक म्हणून दिलेल्या असाव्यात. याप्रकरणी पोलिसात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार गोपाल भोई करीत आहेत. दरम्यान, मयत इंदलसिंग ठाकूर याच्या नातेवाईकांची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी सांगितले. 
 
नोकरीसाठी राजकीय नेत्यांना पत्रे 
मयत इंदलसिंग ठाकूर याने त्याला शासकीय नोकरी मिळावी म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव, उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह देशातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना पत्रे पाठवली आहेत. विशेष म्हणजे, त्याला नोकरीत सामावून घेण्याबाबती काही पुढाऱ्यांची पत्रेही पोलिसांना त्याच्या पिशवीत मिळून आली. 
 

loading image