गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

जळगाव : अतिवृष्टीमुळे शेतातील चारा पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा दूध संघाने गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. 
जिल्हा दूध संघातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चेअरमन मंदाताई खडसे व संचालकमंडळाने निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने गायीच्या खरेदी दूध दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 27 रुपयांवरून हा खरेदी दर आता 29 रुपये करण्यात आला आहे. 

चाऱ्याकरिता मका बियाणे 
अतिवृष्टीमुळे चारा खराब झाला असून बुरशीयुक्त काळा झालेला चारा जनावरांना खाऊ घालणे शक्‍यतो टाळावे, हा चारा उन्हात तीन चार दिवस वाळवून त्यावर चुन्याची निवळी (प्रमाण एक किलो कळीचा चुना: दहा लिटर पाणी)टाकावी. तसा प्रक्रिया केलेला चारा कमी प्रमाणात जनावरांना खाऊ घालावा. तसेच शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याकरिता संघामार्फत मका बियाणे दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district milk federation cow milk