जळगाव भाजप जिल्हाध्यक्षांकडून ड्रग माफियांना संरक्षण : नवाब मलीक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील ड्रग माफियांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडून संरक्षण देण्यात येत आहे.या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी जळगावात पत्रकार परिषदेत केली. 

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील ड्रग माफियांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडून संरक्षण देण्यात येत आहे.या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी जळगावात पत्रकार परिषदेत केली. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस अमळनेर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गफ्फार मलीक उपस्थित होते. यावेळी बोलतांना मलीक म्हणाले,कि अमळनेर अंमली पदार्थ विक्रेता राजेश कंजर यांला पोलीसांनी 110 किलो गाजांसह पकडले. पोलीस कारवाई होवू नये यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी त्याच्याकडून दहा लाख रूपये घेतले. मात्र त्यानंतरही त्याच्यावर पोलीस कारवाई झाली. त्यावेळी कंजर याने वाघ यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यावेळी त्यांनी केवळ पाच लाख रूपये परत केले. उर्वरीत पाच लाख रूपये त्याच्या गांजा विक्रीच्या व्यवसायाला सरंक्षण देण्यासाठी पोलीसांना दिले असे त्यांनी सांगितले. त्यांच्या संभाषणाची व्हीडीओ क्‍लिपचा पुरावा असून कंजर हा या प्रकरणी पोलीसात जाबाब देण्यासही तयार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष ड्रग माफियांना संरक्षण देत आहेत.ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्यात येणार असल्याचेही मलीक यांनी सांगितले पोलीसांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर राज्यात भाजपच्या नेत्यांचे वाळूमाफिया, ड्रग माफिया याना सरक्षंण आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब हे वाळू माफियांना सोडण्यासाठी पोलीसावर दबाब आणतात. राज्यात हा काय प्रकार चालू आहे?हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
 
वाघांवर कारवाई करावी:अनिल पाटील 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमळनेर येथील माजी जि.प.सदस्य अनिल भाईदास पाटील म्हणाले, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या माध्यमातून तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. ते या धंदे चालकांकडून हप्ते घेत आहेत. अवैध धंद्यावाल्याकडून पैसे घेण्याप्रकरणाची व्हीडीओ क्‍लिप तयार करण्यात आली आहे. यात त्यांनी दहा लाख रूपये घेतल्याचा उल्लेख आहे. या व्हीडीओ क्‍लीपच्या आधारावर वाघ यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही अनिल पाटील यानीं दिला आहे.

Web Title: marathi news jalgaon drug navab malik