"लॉकडाउन'  मध्ये आजीबाईंची अनोखी कला... नातवांसाठी बनविला "लुडो', वातींद्वारे ईश्‍वराची भक्ती !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

आजीबाईंनी अनोखी कलात्मकता वापरत नातवांना खेळण्यासाठी "लुडो' गेम साकारला आहे तर दुसऱ्या वृद्धेने हजारो फुलवाती करत भक्तीचे दर्शन घडविले आहे.

जळगाव  : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांचे सध्या "स्टे होम' सुरू आहे. या वेळेचा कुणी कसा सदुपयोग करेल, सांगता येत नाही. अशात एका आजीबाईंनी अनोखी कलात्मकता वापरत नातवांना खेळण्यासाठी "लुडो' गेम साकारला आहे तर दुसऱ्या वृद्धेने हजारो फुलवाती करत भक्तीचे दर्शन घडविले आहे. 

कोरोनाच्या संसर्गाने जगभरात व पर्यायाने भारतातही थैमान घातले असून, सरकारने 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जारी केले. या "लॉकडाउन'मध्ये नागरिकांना "स्टे होम'चे आवाहन करण्यात आले असून बहुतांश लोक त्यासंबंधी मार्गदर्शक सूचना पाळत आहेत. यानिमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य गेल्या पंधरा दिवसांपासून घरातच एकत्रित राहत असून त्यातून विविध उपक्रम, खेळ, गोष्टी साकारल्या जात आहेत. 

आर्वजून पहा :आपत्कालीन स्थितीसाठी साडेतीन हजारांवर "बेड' :  डॉ. चव्हाण 
 

आजीबाईंचेही योगदान 
या स्थितीत दोघा आजीबाईंनी आपल्या कलेला वाव देत विविध गोष्टी साकारण्याचा प्रयत्न केला. यात 82 वर्षीय रत्नप्रभा गांधी यांनी नातवांसाठी आकर्षक व अनोख्या अशा "लुडो' गेमची निर्मिती केली. बाजारात मिळतो, त्याच्या अगदी हटके असा हा गेम मुलांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. तर रिंगरोड परिसरातील 75 वर्षीय वृद्धा इंदू बियाणी यांनीही हजारो फुलवातींची निर्मिती करत या वेळेचा सदुपयोग करून दाखविला आहे. वार्धक्‍याच्या काळातही उत्साह दाखवून या आजीबाईंनी साकारलेल्या गोष्टी अनुकरणीय अशाच आहेत. 

नक्की वाचा : "लॉकडाऊन'मध्ये ...सहा लाख जनतेची तहान भागवताहेत 341 कर्मचारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon During the lockdown The unique art of grandparents