खडसे समर्थकांचा हल्लाबोल...चंद्रकांतदादा मागे लपलेल्यांची वाक्‍ये बोलू नका...लोक हसतील ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

स्वत:ला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद ते दानवे पिता पुत्र आहेतच आणि हो..ते विखे घराणे??? शोध लावतांना हे कसे विसरला? मागे लपलेल्यांच्या तोंडातील वाक्‍य बोलू नका लोक हसतील. 

जळगाव : चंद्रकांतदादा मागे लपलेल्यांची वाक्‍ये बोलू नका..लोक हसतील!या मथळ्याखाली व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खडसे समर्थकांनी सोशल मिडीयावर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. 

नक्की वाचा : आमदारकीसाठी कोल्हापुरातून पुण्याला कोण गेले? : एकनाथराव खडसे 
 

भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माध्यमातून एकमेकावर शाब्दीक हल्ला केला. आता खडसे समर्थक कार्यकर्तेही यात उतरले असून व्यंगचित्राच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला सुरू केला आहे. व्यंगचित्रात चंद्रकांत पाटील उभे असून त्यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत. मागे लपलेल्यांची वाक्‍ये बोलू नका..लोक हसतील हा मथळा देण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर बायको, मुलीला पदे दिल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार म्हटले आहे, मंत्री होता ना? मग तरी अभ्यास कच्चाच असं कसं हो "ढ".. सहकारातील पदे आहेत तत्कालीन सरकारची मेहरबानी नाही रितसर निवडून आल्या आहेत. सर्व पक्षीय संचालकांनी बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सर्व पक्षीयांनी निवड करण्यासाठी पत लागते हो..कधी स्वप्नात बघितले होते, भाजपच्या माणसाला महानंदचे पद...मागे लपलेल्यांच्या तोडांतील वाक्‍य बोलू नका लोक हसतील. 

अजब गजब शोधांचा नोबल विजेता 
नाथाभाऊंची घराणेशाही आहे या चंद्रकांत पाटील यांच्या वाक्‍यास दुसऱ्या व्यंगचित्रात उत्तर दिले असून त्यात म्हटले आहे, अजब गजब शोधांचा नोबल विजेता, एकच घर दिसल? बमाकिचे काय शोपीस म्हणून ठेवले? तुमचे काका आहेत? गंगाधरराव फडणवीस आमदार, काकू तीस वर्षे आमदार, चार वर्षे मंत्री डाळ आली नसती तर पाच वर्ष असत्या, स्वत:ला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद ते दानवे पिता पुत्र आहेतच आणि हो..ते विखे घराणे??? शोध लावतांना हे कसे विसरला? मागे लपलेल्यांच्या तोंडातील वाक्‍य बोलू नका लोक हसतील. 

क्‍लिक कराः भुसावळात अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची अशीही तत्परता
 

गुरूसारखा अभ्यासही कच्चा आहे 
नाथाभाऊ 1988 ला भाजपत आल्याचा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला उत्तर तिसऱ्या व्यंगचित्रात देण्यात आले आहे. यात म्हटले आहे. ओ..शोध मास्टर..तुमच्या गुरूसारखा तुमचा अभ्यासही कच्चा आहे.1980मध्ये भाजपा स्थापन झाला तेंव्हापासून सदस्य,1982 मध्ये विश्‍व हिंदू परिषदेच्या अधिवेशनास हजर, 1983मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळजाई येथील अधिवेशनास उपस्थिती, 1982 ते 90 भाजप पंचायत समिती सदस्य. सोशल मिडीयावर हे व्यंगचित्र व्हायरल करण्यात आले आहेत. खडसे हे आक्रमक पध्दतीने उत्तरे देत आहेत. आता कार्यकर्तेही आक्रमक झाले असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून खडसे यांना पाठींबा देत असून भाजपच्या नेत्यांवर शाब्दीक हल्ला करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse Chandrakant Patil supporters attack