303 उमेदवारांचा खर्च 84 लाख रुपये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारांना 5 लाखांची खर्च मर्यादा व ऑनलाईन खर्च सादर करण्याचे निवडणूक आयोगातर्फे निर्देश दिले आहे. त्यानुसार रविवार पर्यंत 19 प्रभागात उभे राहीले 303 उमेदवारांनी "ट्रू' वोटर ऍपवर 83 लाख 75 हजार रुपये ईतका ऑनलाईन खर्च सादर केला आहे. यात प्रभाग 12 मध्ये सर्वाधीक 5 लाख 99 हजार तर सर्वात कमी प्रभाग 19 मध्ये सर्वांत कमी 1 लाख 44 हजार रूपयांची नोद आहे. 

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 303 उमेदवार असून त्यांना दररोजचा खर्च हा ऑनलाईन सादर करावा लागत आहे. त्यानुसार "ट्रू' वोटर ऍप द्वारे ऑनलाईन खर्च उमेदवारांकडून सादर केला जात आहे. त्यानुसार प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरानूसार खर्च उमेदवारांना द्यावा लागत आहे. आठ दिवपासूर्वी काही उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली होती. निवडणुक विभागातर्फे या उमेदवारांना नोटीस देवून दरानुसार खर्च सादर करण्याचे सुचना दिल्या होत्या. 

प्रभाग 12 मध्ये सर्वाधीक खर्च 
प्रभाग 12 मध्ये अ. ब. क. ड. मध्ये नऊ उमेदवार रिंगणात आहे. नऊ उमेदवारांचा निवडणुक प्रचार, कार्यकर्त्यांवरील खर्च, साहित्य आदीवरील खर्च सर्वाधीक असल्याचे नोंद "ट्रू' वोटर ऍपवर नोंद झाली आहे. तर सर्वात कमी प्रभाग 19 मधील अ.ब.क मधील आठ उमेदवारांचा खर्च हा 1 लाख 44 हजार रुपये आहे. 

841 खर्चामध्ये तफावत 
दैनंदिन सादर करण्यात खर्चामध्ये 841 तफावत आढळून आली आहे. निवडणूक खर्च निरीक्षकांकडून करण्यात आलेल्या पाहणीत अनेक उमेदवारांनी जास्त खर्च केला आहे. मात्र, त्यांनी सादर करतांना कमी खर्च दिला असल्याने अशा उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे.

Web Title: marathi news jalgaon election 303 candidate 8f4 lakh