"अपक्षां'च्या माघारीसाठी जोरदार "फिल्डिंग' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकींतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अर्ज छाननीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात दोन दिवसांपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून, उद्या (17 जुलै) दुपारी तीनपर्यंत वेळ आहे. यात अनेक प्रभागांमध्ये "अपक्ष' म्हणून अर्ज दाखल केलेले उमेदवार आपल्या मतांवर परिणाम करतील, अशांच्या माघारीसाठी सर्वच राजकीय नेते व उमेदवारांकडून जोरदार "फिल्डिंग' लावली जात आहे. उद्या (17 जुलै) शेवटच्या दिवशी कोण-कोण अर्ज मागे घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

जळगाव महापालिका निवडणूक 2018 साठी एकूण 615 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज छाननीच्या प्रक्रियेत 188 जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर 427 अर्ज वैध ठरवून 17 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत देण्यात आली. त्यानुसार शनिवार (14 जुलै)पासूनच अर्ज मागे घेण्याला सुरवात झाली. पहिल्या दिवशी चार जणांनी अर्ज मागे घेतले, तर आज (16 जुलै) 21 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 24 जणांनी 25 उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 

माघारीसाठी जोरदार "फिल्डिंग' 
सर्वच 19 प्रभागांत मोठ्या प्रमाणात "अपक्षां'नी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पक्षांच्या उमेदवारांचे अनेक प्रभागांत "अपक्ष' मतांचे गणित बिघडविण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 
या "अपक्षां'ची मनधरणी करून त्यांना अर्ज मागे घेण्याची जोरदार "फिल्डिंग' आज लावली जाताना दिसून आली. 

"अपक्ष' पुरस्कृतसाठीही हालचाली 
काही प्रभागांत "अपक्ष' उमेदवाराची बाजू भक्कम असल्याने राजकीय पक्षाने त्यांच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगून "अपक्षा'ला पुरस्कृत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे उद्या (17 जुलै) माघारीची 
अंतिम मुदत असून, कोण माघार घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आज माघार घेतलेल्यांची नावे 
खान रशीद खान अमिर खान (प्रभाग क्र. 1 "अ'), अशोक सनकत (प्रभाग क्र. 4 "अ'), विजय वाडकर, राजेश दोषी (प्रभाग क्र. 5 "ड'), रचना पाटील (प्रभाग क्र. 5 "ब'), साबेरा रहीम तडवी (प्रभाग क्र. 5 "क'), आशा ठाकरे (प्रभाग क्र. 9 "अ'), विकास सोनवणे (प्रभाग क्र. 10 "अ'), पंकज पाटील, खान जावेद रसूल (प्रभाग क्र. 10 "ड'), तडवी परवेझ मोहम्मद (प्रभाग क्र. 11 "अ'), विमलबाई अकडमोल (प्रभाग क्र. 13 "अ'), राजश्री चव्हाण (प्रभाग क्र. 13 व 14 "अ'), ज्योती चव्हाण (प्रभाग क्र. 14 "अ'), गोपाळ सोनवणे (प्रभाग क्र. 14 "ड'), लीलाबाई सोनवणे (प्रभाग क्र. 14 "अ'), नसिबदरा इक्‍बाल्लोद्दीन पिरजादे (प्रभाग क्र. 15 "अ'), अशोक मंधान (प्रभाग क्र. 16 "ड'), सुरेश भाट, स्वाती पाटील (प्रभाग क्र. 16 "अ'). 
 
Web Title: marathi news jalgaon election apaksh maghari