Loksabha 2019 : प्रत्येक विधानसभा मतदारसंघात "एक आदर्श-सखी मतदान केंद्र'! 

देविदास वाणी
गुरुवार, 11 एप्रिल 2019

जळगाव ः विधानसभा मतदारसंघनिहाय "एक आदर्श व एक सखी मतदान केंद्र' तयार करणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली. मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी यावे यासाठी मतदारांसाठी "सेल्फी पॉइंट' ठेवले जातील. मतदारांनी मतदान केले की तेथे येऊन ते "सेल्फी' काढतील. यासाठी "सेल्फी पॉइंट' आकर्षकरीत्या सजविला जाईल. 

माहिती संकलित करणे सुरू 
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रे कोठे असावे, त्या परिसरातील मतदारसंख्या याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांतच माहिती पूर्ण होताच विधानसभा मतदारसंघातील "आदर्श व सखी मतदान केंद्रा'ची घोषणा केली जाईल. 

महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती 
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात "एक आदर्श व सखी मतदान केंद्र' तयार करण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्रात सर्व कर्मचारी महिला असतील. आदर्श मतदान केंद्राची इमारत, फर्निचरबरोबरच मतदानाविषयीच्या सूचना, चिन्ह, खुणा व लोगो हे डिसप्ले बोर्डावर दाखविण्यात येणार आहे. 
 
प्रतीक्षा कक्ष अन्‌ पाळणाघरही! 

मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक, मतदारांना आवश्‍यक असलेल्या सोयी-सुविधा; जसे वीज, पाणी, शौचालय, प्रथमोपचार पेटी, व्हीलचेअर, मतदान केंद्रात गर्दी असल्यास मतदारांसाठी प्रतीक्षा कक्ष, तान्हाबाळांसाठी पाळणाघर, सेल्फी पॉइंट, मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकसारखा युनिफॉर्म (ड्रेसकोड), मतदारांच्या प्रतिक्रिया नोंदणी फॉर्म आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध सेवाभावी सामाजिक संस्था, स्काउट- गाइडची मुले-मुली, स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon election center one aadrsh sakhi