Loksabha 2019 : मतदान केंद्रावर होणार स्वयंसेवकाची नेमणूक 

Loksabha 2019 : मतदान केंद्रावर होणार स्वयंसेवकाची नेमणूक 

जळगाव ः दिव्यांग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगातर्फे स्वयंसेवकाची नेमणूक केली जाणार आहे. याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, त्यानुसार त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 
लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली असून, सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे अंमलबजावणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे दिव्यांगांना मतदानासाठी होणारी त्यांची फरफट थांबून त्यांना मतदान करण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवकाची नेमणूक करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबतचे पत्रही जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले असून, त्यानुसार स्वयंसेवकाची नेमणूक केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

स्वयंसेवक नियुक्तीसाठीच्या अटी 
स्वयंसेवकाची नियुक्ती ही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने करावी, हे स्वयंसेवक त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जबाबदार राहतील, एन.सी.सी, एन. एस. एस व स्काऊट गाईड व चुनाव पाठशाळा या विद्यार्थ्यांमधून स्वयंसेवकांची नेमणूक करता येईल, स्वयंसेवकाची वयोमर्यादा 14 ते 17 वर्षे असावी तसेच तो राजकीय पक्षाचा नसावा, स्वयंसेवकांनी केवळ दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यास सहाय्य करावे, तसेच स्वयंसेवकाने कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराचा प्रचार केल्यास त्याची सेवा समाप्ती तत्काळ करावी, अशी नियमावली निवडणुक आयोगाने लागू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com