पहिल्याच दिवशी 250 कर्मचाऱ्यांनी ड्युटी रद्द करण्यासाठी घेतले अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जळगाव ः जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे वीस हजार कर्मचारी लागणार आहेत. या सर्वांना नियुक्तीपत्रेही पाठविली आहेत. मात्र, अनेकांनी विविध कारणे दाखवून ड्युटी रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत. समितीने नेमल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 250 कर्मचाऱ्यांनी या-ना ती कारणे दाखवून ड्युटी रद्द करण्यासाठीचे अर्ज नेले आहेत. 

जळगाव ः जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे वीस हजार कर्मचारी लागणार आहेत. या सर्वांना नियुक्तीपत्रेही पाठविली आहेत. मात्र, अनेकांनी विविध कारणे दाखवून ड्युटी रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत. समितीने नेमल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 250 कर्मचाऱ्यांनी या-ना ती कारणे दाखवून ड्युटी रद्द करण्यासाठीचे अर्ज नेले आहेत. 
कर्मचाऱ्यांना ड्युटीबाबत काही तक्रारी असल्यास त्या निवारणासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निवडणूक कर्मचारी तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे. निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींची नावे दोन ठिकाणी आहेत, काहींना हृदयविकाराचा त्रास आहे अशा एक ना अनेक कारणांमुळे नेमलेले कर्मचारी आपली "इलेक्‍शन ड्युटी' रद्द करून घेण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहे. या कर्मचाऱ्यांनी ड्युटी रद्द करण्याबाबत दिलेली कारणे योग्य आहेत किंवा नाही, त्यांची ड्युटी रद्द करावी किंवा नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी या समितीला अधिकार दिले आहेत. 
या समितीचे प्रमुख जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आहेत. सदस्य म्हणून सहाय्यक संशोधन अधिकारी जी. ए. ढोले, डी. एस. पाटील, ए. डी. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

या कारणानेच ड्युटी रद्द होऊ शकते 
अनेक शिक्षक किंवा इतर कर्मचारी आपली इलेक्‍शन ड्युटी रद्द व्हावी म्हणून अर्ज करतात. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ चार कारणांमुळेच ड्युटी रद्द करण्याचे आदेश दिले. जर संबंधित कर्मचारी या कारणांमध्ये बसत असेल, ज्याकडे त्याबाबतचा पुरावा असेल तर त्याची ड्युटी रद्द होईल; अन्यथा नाही. 

कारणे पुढीलप्रमाणे 
 तो संबंधित विभागाचा सीनिअर अधिकारी आहे 
 ज्यांची ड्युटी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावली आहे 
 जे कर्मचारी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत (पुरावा आवश्‍यक) 
 ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे (त्याबाबत पुरावा आवश्‍यक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election duty 250 form cancal