मतदार याद्यांचे होणार पुनर्निरीक्षण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

जळगाव ः निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. 
कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांतर्फे घरोघरी भेटी देऊन पडताळणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 20 जूनपर्यंत सुरू राहील. 

मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रिय भाग घेऊन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. जेणेकरून मतदार याद्या अचूक व परिपूर्ण होऊन ऐनवेळी पात्र मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळली गेल्याबाबतची तक्रार करण्यास वाव राहणार नाही, असे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले. 
 
मतदार याद्यांचा कार्यक्रम असा 
1 सप्टेंबर ः प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 
1 सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोबर ः दावे, हरकती स्वीकारल्या जातील. 
30 नोव्हेंबर ः दावे, हरकती निकाली 
3 जानेवारी 2019 ः मतदार याद्यांच्या डाटाबेसचे अद्यावतीकरण 
4 जानेवारी 2019 ः अंतिम मतदार यादी प्रसिद्ध 

Web Title: marathi news jalgaon election list