"मनपा' निवडणूक "खाविआ' नव्हे; "धनुष्यबाणा'वरच! : संजय सावंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणूक माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी नव्हे; तर शिवसेनेच्या "धनुष्यबाण' चिन्हावरच लढणार आहे. मात्र, भाजपसोबत युती झाल्यास जागावाटपाचे अधिकार सुरेशदादा जैन हेच घेणार आहेत, असा निर्णय शिवसेनेतर्फे आज घेण्यात आला. जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

शिवाजीनगरातील सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. यावेळी माजी आमदार सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर ललित कोल्हे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर रमेश जैन, माजी आमदार आर. ओ. पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अमर जैन, माजी उपमहापौर सुनील महाजन उपस्थित होते. 
यावेळी महापालिका निवडणूक तसेच युतीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा संपर्कप्रमुख सावंत यांनी सांगितले, की महापालिका निवडणूक शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली "धनुष्यबाण' चिन्हावरच लढण्यात येणार आहे. भाजपसोबत युती करण्यासह जागावाटपाचा निर्णय सुरेशदादा जैन हेच घेतील. जागावाटपाबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच युती करण्यात येईल. 

जैन यांचीही सहमती 
जिल्हा संपर्कप्रमुख सावंत यांनी महापालिका निवडणूक "धनुष्यबाण' चिन्हावर लढण्याच्या घेतलेल्या निर्णयाला माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनीही सहमती दर्शविली आहे. 

Web Title: marathi news jalgaon election shisena sanjay sawant