दोन दिवसांत "युती'चा निर्णय : सुरेशदादा जैन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारच्या बैठकीत खानदेश विकास आघाडी, भाजप, शिवसेना युतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, जागा वाटपाबाबत निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत "युती'चा निर्णय होईल, अशी माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली. 

शिवाजीनगरातील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत झालेल्या भेटीत त्यांनी युती करण्यात सकारात्मकता दाखविली. त्यानंतर आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक घेऊन महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यास सांगितले. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या चिन्हांवर महापालिका निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. तर वेळप्रसंगी शिवसेनेच्या चिन्हावर महापालिका निवडणूक लढण्यात येईल. 

युती दोन दिवसांत 
भाजप-सेना-खाविआ युतीबाबत ते म्हणाले, स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या जागा वाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर युतीचा निर्णय घेण्यात येईल. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. युती झाल्यास पहिला महापौर आमचा करण्याचा यासाठी आग्रह राहणार आहे. परंतु, वेळप्रसंगी सव्वा- सव्वा वर्ष महापौरपदाचा कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे त्यांचा देखील महापौर असू शकतो. महापौर कुणाचा यापेक्षा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वय ठेवून युतीचा निर्णय घेण्यात आला आहे, हे लक्षात घेऊन आपली नेहमी सकारात्मक भूमिका राहणार आहे.

Web Title: marathi news jalgaon election sureshdada jain