"मनपा' प्रशासनाकडून अडीच लाख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीत मतदारांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून मतदार चिठ्ठी घरोघरी आठ दिवसांपासून वाटप केली जात आहे. गुरुवारी (26 जुलै) दोन लाख 42 हजार 446 मतदारांना मतदार चिठ्ठ्या दिल्या गेल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. 

जळगाव ः महापालिका निवडणुकीत मतदारांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून मतदार चिठ्ठी घरोघरी आठ दिवसांपासून वाटप केली जात आहे. गुरुवारी (26 जुलै) दोन लाख 42 हजार 446 मतदारांना मतदार चिठ्ठ्या दिल्या गेल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. 
महापालिका 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान एक ऑगस्टला होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना आपले नाव कोणत्या यादीत आहे, हे सापडत नाही. त्यामुळे मतदारांची धावपळ होऊ नये. तसेच नाव सापडत नाही, कुठे मतदान केंद्र या कारणांमुळे मतदार मतदानापासूनही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप प्रशासनाकडून करण्याची सूचना आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून आठ दिवसांपासून मतदार चिठ्ठ्या वाटप केल्या जात आहेत. या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. 

बीएलओ, आशा वर्कर, "मनपा' कर्मचाऱ्यांकडून चिठ्ठ्या वाटप 
बीएलओ, "मनपा' कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. बीएलओंना स्वतंत्र प्रभाग व काही भाग विभागून दिले आहेत. मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला सायंकाळी दिवसभराचा अहवाल निवडणूक विभागाकडे द्यावा लागत आहे. त्यानंतर "मनपा' प्रशासनाकडून मतदारांना मोबाईलव्दारे संपर्क करून त्यांना मतदार चिठ्ठी मिळाल्याची पडताळणीही केली जात आहे. 

एक लाख 22 हजार चिठ्ठ्या अजून बाकी 
मतदानासाठी चार दिवस बाकी असून अद्याप एक लाख बावीस हजार 626 मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे बाकी आहे. 30 जुलैपर्यंतच या चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर एक ऑगस्टला मतदान केंद्रावरही "मनपा'कडून मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिली आहे.

Web Title: marathi news jalgaon election voter chit distribut