कोणाला "मतदान' झाल्याची दिसणार मतदाराला स्लीप 

देविदास वाणी
रविवार, 9 डिसेंबर 2018

जळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशिन सोबतच "व्हीव्हीपॅट' मशिनही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. "व्हीव्हीपॅट'मशिनमुळे मतदारांना आपण कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले होते त्याबाबतची एक स्लीप दिसेल. या मशिनच्या स्क्रीनवर ही स्लीप "सात सेकंद' दिसेल. नंतर ती खालील बॉक्‍समध्ये पडेल. 

यामुळे मतदानाचे बटन कोणत्या पक्षाच्या उमेदवारासमोरील दाबले व मतदान कोणाला झाले हे तेथेच स्पष्ट होण्यास मतदारांना मदत होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने मतदारांचा लोकशाहीवरील विश्‍वास अधिकच दृढ होणार आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. लोकसभा मतदानाच्या तयारीसाठी विविध टप्पे आहेत. ईव्हीएम मशिन सोबतच प्रत्येक मतदार केंद्रात "व्हीव्हीपॅट' मशिन बसविले जातील. 4354 इव्हीएम मशिनसोबतच तेवढेच व्हीव्हीपॅट मशिन बसविले जातील. 
 
गावागावांत प्रात्यक्षिके 
लवकरच "व्हीव्हीपॅट'मशिनबाबत मतदारांना जनजागृती केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात दोन-दोन पथके मतदानाबाबत, मशिन बाबत माहिती देईल. निवडणूक आयोगाच्या संदेशाचे सामूहिक वाचन, व्हीडीओ स्लीप दाखविल्या जातील. "व्हीव्हीपॅट'द्वारे मतदारांना मतदान केल्याचे कसे कळेल याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष मतदान घेऊन मतदानाला दाखविले जाईल. त्याबाबत जिल्हा प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. 
 
1400 मतदान केंद्रांचे जिओ टॅगींग 
जिल्ह्यात एकूण 3 हजार 532 मतदान केंद्रे आहेत. त्या मतदान केंद्राचा फोटो निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नावासह अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 1400 मतदान केंद्र जिओ टॅगींग करण्यात आले. पंधरा दिवसात शंभर टक्के मतदान केंद्रे जिओ टॅगींग होतील. 
 
मतदान केल्यानंतर ते कोणाला मतदान केले याची एक पावती व्हीव्हीपॅट मशिनच्या स्क्रीनवर "सात सेकंद' दिसेल. मतदान गोपनीय असते. ते फक्त मतदान करणाऱ्यास दिसणे गरजेचे आहे. यामुळे निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मशिन लावण्याच्या निर्णय घेतला आहे. 
-प्रमोद भामरे, निवडणूक उपजिल्हाधिकारी. 

Web Title: marathi news jalgaon election voter VVPAT machine