हॉकर्स संघर्ष समितीचा भाजपला पाठिंबा 

हॉकर्स संघर्ष समितीचा भाजपला पाठिंबा 

जळगाव ः शहरातील हॉंकर्स व फेरीवाले यांचा अनेक दिवसापासून प्रश्‍न प्रलंबित आहे. मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर हॉंकर्स चा प्रश्‍न आम्ही मार्गी लावू असे आश्‍वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हॉकर्स संघर्ष समितीच्या बैठकीत दिले. यावेळी समितीतर्फे भाजपला निवडणूक पांठीबा देण्याचे ठराव करण्यात आला. 

जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीतर्फे जळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असा इशारा दिला होता. याबाबत आज जिल्हा हॉंकर्स संघर्ष समितीची बैठक भाजपतर्फे दुपारी दोन वाजता बळीराम पेठ येथे मंगलकार्यालयात झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, यावेळी आमदार चंदुलाल पटेल, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, श्रीराम खटोड तसेच हॉकर्स संघर्ष समितीचे होनाजी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुढे बोलताना महाजन म्हणाले, की भाजपच्या जाहीर नाम्यात हॉकर्स प्रश्‍न सोडविण्याचा आम्ही जाहीर केले आहे. त्यानुसार मनपात सत्ता आल्यावर आम्ही यावर अंमलबजावणी करून हॉकर्सचा कायमस्वरूपी प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देतो. मतदानावर बहिष्कार टाकून प्रश्‍न सुटणार नाही असे म्हणाले. बैठकीस मोठ्या संख्येने हॉकर्सची उपस्थिती होती. 

हॉकर्स करणार भाजपचा प्रचार 
निवडणूक प्रचाराला एक दिवस जरी बाकी असला तरी शहरातील 4 हजार हॉंकर्स बांधव भाजपा सोबत राहणार आहे. भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार हा शहरात करणार असा ठराव देखील यावेळी हॉकर्स संघर्ष समिती च्या वतीने घेतला आहे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com