वीज बिल साडेतीन कोटी अन्‌ मिळाले एक कोटी !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

जळगाव ः ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पाणी योजनांसाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याचे बिल ग्रामपंचायतींकडून थकीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे महावितरणकडून योजनेचे कनेक्‍शन कापण्याचे काम केले जाते. दुष्काळी स्थिती असल्याने शासनाकडून बिल अदा केले जाणार आहे. मात्र वीज बिलासाठी महिन्याला साडेतीन कोटी बिल येत असून याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभागास गेल्या तीन महिन्यात केवळ एक कोटी प्राप्त झाले आहेत. 

पाणीपुरवठा योजनांसाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्यापोटी महावितरणला बिल भरणा करावा लागत असतो. यात जिल्ह्यात एकूण 17 योजनांद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या योजनांसाठी जिल्हा परिषदेला महिन्याला साधारण साडेतीन कोटी रुपयांचे वीज बिल येत असते. ग्रामपंचायतींकडून बिलाचा भरणा केला जात नसल्याने "महावितरण'कडून कनेक्‍शन कट केले जात आहे. यात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने ज्या- ज्या ठिकाणी विजेची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची वीज कनेक्‍शन कट केले असेल, अशा ग्रामपंचायतींसह जवळपास सर्वच ग्रामपंचायतींकडे थकीत बिलाच्या पाच टक्‍के रक्‍कम शासन भरणार आहे. मात्र या पाच टक्‍के रक्‍कमेनुसार जिल्हा परिषदेला अद्याप निधी मिळालेला नाही. 

केवळ एक कोटी प्राप्त 
दुष्काळी परिस्थिती पाहता पाणी योजनांचे वीज कनेक्‍शन कट होऊ नये; या अनुषंगाने थकीत बिलातील पाच टक्‍के रक्‍कम आणि नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांकरिता शासनाकडून चालू बिलातील पूर्ण रक्‍कम दिली जाणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या 17 पाणी योजनांद्वारे पाणीपुरवठा होत असून, या योजनांसाठी महिन्याकाठी साधारण साडेतीन कोटी रुपयांचे बिलाची आकारणी महावितरणकडून करण्यात येत असते. मात्र तीन महिन्यासाठीचे केवळ एक कोटी रुपये जिल्हा परिषदेला पाणी योजनांच्या वीज बिलापोटी प्राप्त झाले आहेत. अर्थात महिन्याचे साडेतीन कोटी बिल येत असताना अद्याप केवळ एक कोटी प्राप्त झाल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी अडचणीचे झाले आहे. 

पाणी योजना सुरळीत 
जिल्ह्यातील पाणी योजनांची एकूण थकबाकी ही साधारण 9 कोटीच्यावर पोहचली आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महिनाभरापूर्वी "महावितरण'कडून पाणी योजनांचे वीज कनेक्‍शन कापण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने थकीत वीज बिलांसाठी कनेक्‍शन कट न करण्याच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या आहे. यामुळे सध्या स्थितीला सर्वच पाणी योजनांचे वीज कनेक्‍शन सुरळीत सुरू आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon electricity water supply yojna