फेसबुक लाइव्ह'मधून अनुभवला "झिरो शॅडो डे' 

फेसबुक लाइव्ह'मधून अनुभवला "झिरो शॅडो डे' 

जळगाव  : सोमवार व मंगळवार असे सलग दोन दिवस जळगावकरांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शून्य सावली दिवसाचा क्षण दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी अनुभवला. यावेळी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस ही खगोलीय घटना अनुभवता आली. 

सध्याच्या "लॉकडाउन'च्या काळात सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेणे शक्‍य नसल्याने जळगाव खगोलप्रेमी ग्रुपच्या वतीने फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी जळगाव खगोलप्रेमी ग्रुपने तयार केलेले Horizontal Sundial , Equatorial Sundial आणि Armilary Sundial असे तीन सौरघड्याळ (सनडायल) ठेवण्यात आले होते. ते वेळ कशी दाखवतात व हातातील घड्याळ आणि सौर घड्याळ यांच्या वेळेत फरक का असतो? याच फरकामुळे हातातील घडाळ्याप्रमाणे शून्य सावली क्षणाचे विवरण प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगण्यात आले. खगोलप्रेमींनी फेसबुक लाइव्ह बघत हा क्षण अनुभवला. 

हा क्षण दोन दिवसाचे कारण 
एकवीस मार्चला सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर असतो. त्यावेळी तो शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो, त्याला आपण उत्तरायण म्हणतो. 21 जूनला सूर्य +23.5 अंश उत्तरेस असतो. सूर्याला 0 ते + 23.5 अंशापर्यंतचा प्रवास करण्यासाठी तीन महिन्याचा काळ लागतो. याचा अर्थ 21 मार्चपासून सूर्य 0.25 अंशातून उत्तरेकडे सरकत असतो. थोडक्‍यात, सूर्य एका अक्षांवर साधारण दोन दिवस असतो. यामुळे यावेळी आपणास 25 आणि 26 मे असे दोन दिवस शून्य सावली क्षण अनुभवता आला, असे खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com