esakal | नाशिकमध्ये साकारतेय देशातील पहिले "रेस्टॉरंट क्‍लस्टर' 

बोलून बातमी शोधा

restorant cluster

रेस्टॉरंट व्यवसायात रुची ठेवणाऱ्या 15 उद्योजकांना एकत्रित करून त्या उद्योजकांना सार्वजनिक सुविधा पुरवून अत्यल्प भांडवलात स्व:मालकीचे रेस्टॉरंट उभारण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नाशिकमध्ये याची निर्मिती होणार असून, देशातील पहिले रेस्टॉरंट क्‍लस्टर ठरणार आहे. 

नाशिकमध्ये साकारतेय देशातील पहिले "रेस्टॉरंट क्‍लस्टर' 
sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : स्वतःचे रेस्टॉरंट अथवा कॅफे उभारण्याची अनेकांना इच्छा असते. आर्थिक क्षमता असते; परंतु पुरेसा अनुभव, बाजारपेठेची मागणी, पदार्थांची चव आणि त्यांचे सादरीकरण यासारख्या अनेक विषयातील अपुऱ्या ज्ञानामुळे अनेक रेस्टॉरंट बंद पडताना आपण पाहतो. याच गोष्टीवर मात करण्यासाठी अमळनेर येथील वेदांशू पाटील यांनी रेस्टॉरंट क्षेत्रातील बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून "रेस्टॉरंट क्‍लस्टर' ही संकल्पना मांडली. ज्या संकल्पनेच्या आधारे रेस्टॉरंट व्यवसायात रुची ठेवणाऱ्या 15 उद्योजकांना एकत्रित करून त्या उद्योजकांना सार्वजनिक सुविधा पुरवून अत्यल्प भांडवलात स्व:मालकीचे रेस्टॉरंट उभारण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नाशिकमध्ये याची निर्मिती होणार असून, देशातील पहिले रेस्टॉरंट क्‍लस्टर ठरणार आहे. 

हेपण वाचा - शिक्षकाची नोकरी सोडून तिने घेतले एसटीचे स्टेअरींग हाती...मिळविला बहुमान 

पंधरा उद्योजकांना एकत्र करत प्रकल्प
"रेस्टॉरंस्ट क्‍लस्टर' ही अभिनव संकल्पना आहे. नवीन रेस्टॉरंट सुरू करताना पुरेशा ज्ञानाचा अभाव असल्याने अनेक चुका होतात आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागते व रेस्टॉरंट बंद पडते. त्यामुळे आर्थिक फटका तर बसतो, परंतु निराशाही निर्माण होते. हे टाळण्यासाठी उद्योग शाळेच्यावतीने "क्‍लस्टर'मध्ये सहभागी असणाऱ्या 15 उद्योजकांना विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेऊन त्या उद्योजकांना व्यवसाय उभारणी करण्याआधीच योग्य ते प्रशिक्षण देखील दिले जात आहे. खाद्यपदार्थ बनवताना त्यामागचा उत्पादन खर्च आणि मूळ गुंतवणूक, भांडवली खर्च कमी करून निव्वळ नफ्याचे प्रमाण वाढविणे, असे या संकल्पनेमागील उदिष्ट आहे. 

क्‍लिक करा - जामनेरच्या सुपूत्राने केली "नॅनो ड्रोन'ची निर्मिती

नाशिक शहराची केली निवड 
नाशिक येथे वेदांशू पाटील यांनी स्वप्नील रोकडे यांच्या सहकार्याने "गुरुदत्त फूड कोर्ट' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच माध्यमातून "द नाशिक फूड क्‍लस्टर' ही संकल्पना तिडके कॉलनी, गोविंदनगर येथे लवकरच राबविण्यात येणार आहे.

अमळनेरचा राहणारा वेदांशू  
वेंदाशू पाटील हे मूळ अमळनेर (जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील व रवींद्र पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी मुंबई येथून बिझनेस मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले असून, सिंगापूर येथून एमबीए केले आहे. नाशिक येथे ते "उद्योगशाळा'च्या माध्यमातून उद्योजकांना प्रशिक्षण देत असतात. 
 
"क्‍लस्टर'च्या माध्यमातून उद्योजकांना एकत्रित करून विविध विषयांवर कार्यशाळा घेत असतो. त्या माध्यमातून उद्योजकांना व्यवसाय उभारणीचे प्रशिक्षण देण्यात येते. नाशिक येथील "क्‍लस्टर रेस्टॉरंट'चा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यातील महापालिका क्षेत्रातील रेस्टॉरंट चालकांसाठी हा प्रकल्प आपण राबविणार आहोत. 
- वेदांशू पाटील, संस्थापक, "उद्योगशाळा'संस्था नाशिक