जामनेरच्या सुपुत्राने केली ‘नॅनो ड्रोन’ ची निर्मिती 

nano drone
nano drone

जामनेर : देशाच्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या लखनऊ शहरात संरक्षण क्षेत्रातील डीइफ 'एक्स्पो २०२०' अत्याधुनिक युद्ध साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात भारतातील शेकडो तंत्र चिकित्सकांनी सहभाग नोंदवला. यात पुणे येथील अयान आटोनोमस सिस्टीमचे संचालक तथा जामनेरचे सुपुत्र अतुल चौधरी यांनी वजनाने सर्वात लहान हवेत कॅमेऱ्याच्या साह्याने हेरगिरी करणाऱ्या स्पायडी नॅनो ड्रोनने वैज्ञानिकांचे लक्ष वेधले 

कंपनीचे संचालक तथा संशोधक जामनेरचे सुपुत्र अतुल चौधरी यांनी सांगितले की, हे ड्रोन ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर अत्यंत दुर्गम भागात शत्रूच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्करासह निमलष्करी दलांना या ड्रोन्सची मदत होणार आहे. प्रदर्शनात आंतरराष्ट्रीयस्तरावर आमंत्रित संरक्षण विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडून ‘आयन’ च्या ड्रोन ची पाहणी करण्यात आली. संरक्षण विभागाच्या तांत्रिक निकषांवर आयन सिस्टम चे सर्व ड्रोन्स पात्र ठरतील व देशाच्या संरक्षण यंत्रणेत मोलाची कामगिरी करतील, याची मला खात्री असल्याचे अतुल चौधरी यांनी सांगितले. 
 
शेतीसाठी ही बनविला ड्रोन 
आयन आटोनोमस सिस्टीम कंपनीकडून देशाच्या कृषी क्षेत्रात प्रगत शेती पद्धती विकसीत व्हावी, याकरिता केळी, कापूस, ऊस, मका यासारख्या जास्त उंचीच्या पिकांमध्ये फवारणी सुकर व कमी खर्चात व्हावी. करपा, मिलिबग, लाल्या यासारख्या असंख्य किडींचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात यावा याकरिता सर्वंकष फवारणी करणारा ड्रोन ही विकसीत केला आहे. त्याचे वजन साधारण २० किलो असून, हा ड्रोन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदानच असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com