फिटनेस फंडा - चेतन शिरसाळे यांचे दररोज योगा अन्‌ समतोल आहार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

जळगाव नगरपालिकेसह महापालिकेतही शिरसाळे परिवाराने नगरसेवकपद कायम भूषविले आहे. वडील (कै.) नारायण शिरसाळे, बंधू (कै.) अर्जुन शिरसाळे, बंधू अरुण शिरसाळे आणि वहिनी लाजवंती शिरसाळे नगरसेवक होते. आपल्या घराण्याचा वारसा आता चेतन शिरसाळे चालवत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. शिवसेनेचे ते शहरप्रमुखही होते. त्यानंतर गेल्या वेळी त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश केला. यावेळीही ते शिवसेनेतर्फे मैदानात आहेत. 

राजकीय धावपळीत शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीकडे ते लक्ष देतात. रोज सकाळी योगा व प्राणायाम करतात तसेच आहाराकडे विशेष लक्ष पुरविताना समतोल आहारच घेतात. चेतन शिरसाळे समाजिक कार्यात अग्रेसर आहेत. परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी ते सक्रिय असतात. नगरसेवक म्हणून कार्य करताना आपल्या प्रभागातील जनतेला सुविधा देण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. शिवसेना कार्यकर्ता म्हणून त्यांनी प्रभागात कार्य केले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली ते आता कार्य करीत आहेत. त्यांची विविध कामांसाठी सकाळपासूनच दिवसभर धावपळ सुरू असते. यातूनही ते आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देतात. 

असा आहे दिनक्रम 
सकाळी सहाला उठून ते आपल्याच घरातील लॉनमध्ये वॉकिंग करतात. तब्बल तासभर ते साधारणपणे चालण्याचा व्यायाम करतात. त्यानंतर ते योगा आणि प्राणायाम करतात. त्यानंतर आठला ते नाश्‍ता करतात. यात त्यांचा पोहे, इडली-डोसा तसेच चवळी, मटकी असा मेनू असतो. दुपारी एकला दुपारचे जेवण. रात्रीचे जेवण साडेआठला करतात. शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ते करीत असले, तरी शाकाहाराकडेच त्यांचा मुख्यत्वे कल असतो. महिनाभरातून एकदा ते मांसाहार करतात, त्यात मासे अधिक खातात. व्यायामाचा आणि समतोल आहाराचा त्यांचा नित्यनेम बाहेरगावीही कायम असतो. महापालिका निवडणुकीत ते उमेदवार आहेत. प्रचाराच्या धावपळीत एखादा दिवस खंड पडतो. मात्र, एरवी आपण खंड पडू देत नाहीत, असेही ते म्हणतात. 

जीवनात प्रत्येकाला दररोज धावपळ करावी लागते. मात्र, तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे आवश्‍यकच आहे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी समतोल आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या गोष्टी पाळण्याकडे आपला कटाक्ष असतो. त्यातूनच आपण दिवसभर तंदुरुस्त असतो. 
- चेतन शिरसाळे, नगरसेवक, जळगाव 
 
Web Title: marathi news jalgaon fitness fanda chetan shirsale