जळगावसाठी चिंताजण बातमी...आणखी पाच कोरोनाग्रस्तांचे अहवाल पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा बुधवारी 31 संख्या होती. आज मात्र सायंकाळी एक भुसावळचा तसेच आता उशीरा आलेल्या अहवालात पाच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 37 झाली आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज देखील वाढली आहे. आता नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार पाच कोरोनाग्रस्तांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यात जळगाव शहराचे दोन असून एक जोशी पेठ मधला असल्याची विश्‍वसनीय माहिती सोमर येत आहे. 

 धक्कादायक ः मुल गाड झोपेत...तीने का ? उचलले असे पाऊल ! 
 

जळगाव जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल आता थोड्यावेळापूर्वी प्राप्त झाले आहे. यापैकी 51 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर येथील 55 वर्षीय, पाचोरा येथील 56 वर्षीय, तर जळगाव 30 वर्षीय व अडावद 57 वर्षीय पुरूषांचा समावेश असून त्याचा मृत्यू झाला आहे. 

 

 दुर्दैवी घटना ः खेळत होता झोका...अन्‌ असे घडले भयंकर ! 

जिल्ह्याची संख्या आता 37 वर 
जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा बुधवारी 31 संख्या होती. आज मात्र सायंकाळी एक भुसावळचा तसेच आता उशीरा आलेल्या अहवालात पाच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 37 झाली आहे. यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. 

51 जणांचे अहवाल निगेटिव्ह 
निगेटिव्ह अहवालातील 51 व्यक्तींपैकी 16 व्यक्ती या अमळनेरच्या, 6 व्यक्ती पाचोरा, 4 व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Five coronary artery reports are positive