परदेशातून जिल्ह्यात आलेल्यांचे होणार सर्व्हेक्षण  : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

जिल्हाधिकारी कार्यालयास दररोज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सोबतच राज्य नियंत्रण कक्षाद्वारे वेळोवेळी प्राप्त होणारे निर्देश, सूचना यांचे अनुषंगाने कार्यवाही करून जिल्हा प्रशासनामार्फत राज्य नियंत्रण कक्षाशी समन्वय साधण्यास सांगितले आहे. 

जळगाव ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात 1 मार्च 2020 नंतर आलेल्या भारतीय, परदेशी नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाचे आहेत. जळगाव जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत. 

या सर्व्हेक्षणासाठी समन्वयक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे (सामान्य प्रशासन) व जळगाव महापालिकेचे 
मुख्य लेखाधिकारी कपोल पवार यांनी नियुक्ती करण्यात आली. 

"कोरोनो' संशयितांच्या संपर्कात आलेल्यांची होणार तपासणी 
1 मार्चपासून परदेशातून प्रवास करून   जिल्ह्यात आलेल्या भारतीय व परदेशी नागरिकांसंदर्भात, त्यांच्या राहत्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट व 
पाहणीच्या आधारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त असलेल्या, सद्य स्थितीत दवाखान्यात उपचार घेत असलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांनी 1 मार्चपासून विविध ठिकाणी दिलेल्या भेटी व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍ती यांची माहिती घेऊन अशा संपर्कात आलेल्या व्यक्‍तींच्याही 
निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. 

सर्व्हेक्षणाचा संबंधितांचा अहवाल दररोज राज्य नियंत्रण कक्षास व या जिल्हाधिकारी कार्यालयास दररोज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सोबतच राज्य नियंत्रण कक्षाद्वारे वेळोवेळी प्राप्त होणारे निर्देश, सूचना यांचे अनुषंगाने कार्यवाही करून जिल्हा 
प्रशासनामार्फत राज्य नियंत्रण कक्षाशी समन्वय साधण्यास सांगितले आहे. 
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती 
जिल्हास्तरीय सर्वेक्षणासाठी समन्वय 
अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे (9730984504) यांची नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रासाठी निवड झाली आहे. तर जळगाव शहरासाठी महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी कपोल पवार यांची निवड करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon forein people checking for korona virous