पीक कर्ज न देणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

जळगाव ः जिल्हास्तरावर जेव्हा बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठका होतात. त्यात व्यवस्थापकांऐवजी त्यांच्या प्रतिनिधींना पाठविले जाते. ही गंभीर बाब आहे. पिक कर्ज, मुद्रा लोन न देणाऱ्या संबंधित बॅंकांच्या व्यवस्थापकांवर थेट कारवाई करण्यात येईल. त्याबाबतचे आदेश रिझर्व्ह बॅंकेकडून मला मिळाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करण्याबाबत लवकरच जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या व्यवस्थापकांची बैठक घेणार येणार असल्याचे श्री.निंबाळकर यांनी सांगितले. 

जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बॅंकांचे व्यवस्थापक अनुत्सुक आहेत. शेतकऱ्यांना पीककर्ज न मिळाल्यास त्यांच्या पेरण्या खोळंबतील. अर्थव्यवस्थाच शेतीभोवती फिरत असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज राष्ट्रीयकृत बॅंका, जिल्हा बॅंकांनी देण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने आदेश काढले. मात्र संबंधित बॅंकांचे व्यवस्थापक शेतकऱ्यांना कर्ज लवकर देत नाही. यामुळेच आतापर्यंत एकाही राष्ट्रीयकृत बॅंकेने पीक कर्जाचे वाटप केलेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. 
खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारी मुंबईत घेतली. त्यांनी पीककर्ज मिशन मोडवर देण्याच्या सूचना बॅंकांना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्हातील बॅंकांनी करावी यासाठी जिल्हाधिकारी दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व बॅंक अधिकाऱ्यांची बैठक बोलाविणार आहे. त्यात पीक कर्ज वाटपाचे नियोजन, अडचणी, उपाय योजना आदीबाबींवर ऊहापोह होणार आहे. 
 
मुद्रा लोन न देणाऱ्यांवर कारवाई 
मुद्रा योजने अंतर्गत लोन न देणाऱ्या बॅंकांच्या व्यवस्थापकावर थेट कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. या बैठकीत कोणत्या बॅंकेने किती जणांना लोन वाटप केले. लक्षांक काय होता याचा आढावा घेऊन, लक्षांक पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील. तरीही मुद्रा लोनचे वाटप न केल्यास संबंधित बॅंकेच्या व्यवस्थापकावर कारवाई करण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या आहेत. 

त्या डंपरवर कारवाईसाठी पथक 
शहरात गेल्या दोन दिवसात डंपरमध्ये अधिक वाळू भरून नेताना अपघात झाल्याच्या तीन घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. वाळू वाहतूक करणारे डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरतात ? भरत असेल तर त्यांच्यावर कारवाईसाठी एक पथक नेमले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: marathi news jalgaon former pikkarj