खानदेशातील शेतकरी इस्राईल दौऱ्यावर रवाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

रावेर : इस्राईलमध्ये होणाऱ्या ऍग्रीटेक 2018 या जागतिक पातळीवरील कृषी प्रदर्शन आणि कृषी अभ्यास दौऱ्यासाठी जळगाव, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पहिला गट आज उशिरा मुंबईहून रवाना झाला. 

रावेर : इस्राईलमध्ये होणाऱ्या ऍग्रीटेक 2018 या जागतिक पातळीवरील कृषी प्रदर्शन आणि कृषी अभ्यास दौऱ्यासाठी जळगाव, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पहिला गट आज उशिरा मुंबईहून रवाना झाला. 

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली 18 शेतकरी देखील आज रात्री इस्राईलला रवाना झाले. महाराष्ट्र शासनाचा यंदाचे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रगतिशील युवा शेतकरी प्रेमानंद महाजन यांच्यासह "सकाळ'चे बातमीदार दिलीप वैद्य यांच्यासह रावेर तालुक्‍यातील प्रशांत वसंत पाटील (तांदलवाडी), मनोज गंभीर महाजन (ऐनपूर), विशाल अग्रवाल (अटवाडे-रावेर) सुनील गोपाल पाटील (रावेर) हे देखील आज (ता. 6) इस्राईलसाठी रवाना होत आहेत. 

प्रगत तंत्राचा अभ्यास 
आपल्या 6 दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यात हे शेतकरी कृषी प्रदर्शनाची पाहणी करतील. विविध प्रकारच्या शेतात जाऊन फळे, भाजीपाला, फुले यांच्या प्रगत उत्पादन तंत्राचा अभ्यास करतील. या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील सुमारे तीनशे शेतकरी विविध गटातून सहभागी होतील असा अंदाज आहे.

Web Title: marathi news jalgaon former tour