गणेशोत्सवात होणार सोळा टोळ्या हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांतर्फे जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी, डीवायएसपी आणि अप्पर पोलिस अधीक्षकांची एकत्रित बैठक घेण्यात आली. उत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अट्टल गुन्हेगारांवर हद्दपारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधीत प्रभारी अधिकारी आणि डीवायएसपींना यावेळी देण्यात आल्या. 

अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व 35 पोलिस ठाण्यांतील प्रभारी अधिकारी, आठ उपविभागांचे डीवायएसपी यांच्यासह अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आदींची उपस्थिती होती. पोलिस दलाच्या उपविभागनिहाय जिल्ह्यातील संवेदनशील तालुके, गाव आणि यापूर्वी वादाची पार्श्‍वभूमी असलेल्या मंडळांची माहिती घेतल्यावर गणेश मंडळ कार्यकर्त्यांना नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी पाहता जिल्ह्यातील मंडळांची सिटीझन पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी करून परवागी देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत डी.जे. वाजविण्यास पूर्णत: बंदी राहणार असून त्याचे पालन करावे, उत्सवकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 

71 प्रस्ताव हद्दपारीच्या प्रतीक्षेत 
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस ठाणे पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपद्रवक्षम घटकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येत आहे. विविध उपविभागांतून आलेले 71 प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात पाठविले असून, कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिस अधीक्षकांच्या अख्त्यारीत असलेल्या कारवाईत गुन्हेगारी कृत्यात लिप्त आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांत रेकॉर्डवरील सोळा गुन्हेगारी टोळ्यांचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन एकापेक्षा जास्त सदस्य असलेल्या या टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ganesh utsav 16 haddpar