हतनूरला ‘रामसर’ पक्षी अभयारण्य दर्जा द्या : चातक संस्थेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

गोळीबार आणि अतिक्रमण याविषयी चातक ने सविस्तर अहवाल शासनाला पाठवला होता.

तांदलवाडी (ता. रावेर)  : महाराष्ट्र राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई येथील सुनील लिमये यांनी चातक निसर्ग संवर्धन संस्थेला भेट दिली. यावेळी हतनूर धरण जलाशयाला ‘रामसर’ पक्षी अभयारण्य आणि मिश्र वारसा स्थळाचा दर्जा देण्यात यावा, याचा प्रस्ताव चातक संस्थेतर्फे देण्यात आला. 

यावल अभयारण्यात झालेल्या गोळीबार आणि अतिक्रमण प्रकरणी श्री. लिमये पाल (ता. रावेर) येथे दौऱ्यावर आले होते. गोळीबार आणि अतिक्रमण याविषयी चातक ने सविस्तर अहवाल शासनाला पाठवला होता. त्या अनुषंगाने श्री. लिमये, धुळे येथील मुख्यवन संरक्षक अमित कळसकर, नाशिकचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, मुंबईचे उपवनसंरक्षक डी. आर. पाटील यांच्याशी चातकच्या सदस्यांनी चर्चा केली. यावेळी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, कार्यकारणी सदस्य सत्यपालसिंग राजपूत, समीर नेवे, अनिल नारखेडे, नरेंद्र नारखेडे, सौरभ महाजन, मयूर नारखेडे, मिलिंद विसपुते आदी उपस्थित होते. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Give Hatnur dyam the status of 'Ramsar' bird sanctuary