पंधरवड्यात सोन्याच्या दरात 1100 ची घसरण 

पंधरवड्यात सोन्याच्या दरात 1100 ची घसरण 

जळगाव ः यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या बाजारात झळाळी कायम आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याने सोन्याच्या दरात या पंधरवड्यात प्रतितोळा 1100 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला 33900 रुपयांवर पोचलेले भाव आज 32800 वर येऊन ठेपले आहेत. यामुळे आगामी काळात सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. चांदीच्या दरातही 1500 रुपयांची घसरण झाली आहे. 

यंदा कमी झालेला पाऊस, वेळेवर शासनातर्फे सुरू न झालेले कापूस, कडधान्य खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. तरीही घरात मुला-मुलीचे लग्न असल्याने खर्चासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपात आलेले उत्पादन कमी दरात का होईना व्यापाऱ्यांना विकून हातात पैसा उपलब्ध करून घेतला आहे. लग्न कार्यामुळे चढ्या भावातही सोन्याची खरेदी झाली होती. मात्र, आता दर काहीसे कमी झाल्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदीदारांचीही गर्दी सराफ बाजारात दिसणार आहे. 

कुंदन, पेशवाई, राजकोट ज्वेलरी 
लग्नकार्यासाठी सोन्याचे पारंपरिक दागिने खरेदी होत असले, तरी उच्चभ्रू मंडळींकडून सोन्याचा राणीहार, चपलाहारसोबतच इतर कुंदन ज्वेलरी, पेशवाई ज्वेलरी, राजकोट व कोलकताच्या दागिन्यांना चांगली मागणी होत आहे. त्यामुळे सर्वच ज्वेलरी दुकानांमध्ये आकर्षक डिझाईनच्या दागिन्यांची रेलचेल दिसून येत आहे. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य वाढले आहे. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईमुळे सोने, चांदीला मागणी कायम आहे. दरात चढउतार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील रुपयांच्या मूल्यांवर ठरतात. 

- पप्पूशेठ बाफना संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स 


तारीख सोने प्रतितोळा चांदी प्रतिकिलो 
- 28 फेब्रुवारी 33900 41500 
- 1 मार्च 33700 41500 
- 2 मार्च 33500 41500 
- 3 मार्च 33300 41500 
- 4 मार्च 33300 41500 
- 5 मार्च 33100 41500 
- 6 मार्च 32900 41000 
- 7 मार्च 32800 41000 
- 8 मार्च 33500 41500 
- 9 मार्च 33500 41500 
- 10 मार्च 32800 40000 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com