ग्रामपंचायतींची वसुली कागदावर "लय भारी' 

ग्रामपंचायतींची वसुली कागदावर "लय भारी' 

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींकडून केलेली वसुली कागदावर मोठी दिसत आहे. साधारण जिल्ह्यातून मार्चअखेरपर्यंत झालेली वसुली 75 टक्‍क्‍यांवर झाल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु दुष्काळी स्थिती आणि शेतीमालाला भाव न मिळाल्याच्या स्थितीत इतक्‍या मोठ्या प्रमाणात वसुली होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामपंचायतींची ही वसुली झाली असताना विविध पाणी योजनांसह अन्य बिले कशी थकली, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांतर्गत योजना ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येत असतात. यात मुख्य म्हणजे पाणीपुरवठा योजना, घरकुल योजनांचा अधिक भर असतो. गावात पाणीपुरवठा केल्यानंतर याची करवसुली ग्रामपंचायतींना करावी लागत असते. या करवसुलीतून मिळणाऱ्या रकमेतून योजनांवरील वीजबिल देयके अदा करावी लागतात. वर्षभर चालणाऱ्या या प्रक्रियेत ग्रामपंचायतींकडून वार्षिक वसुली साधारण 75 टक्‍क्‍यांवर दाखविण्यात आली आहे. परंतु यंदाच्या शेती हंगामाची स्थिती पाहता शेतकऱ्यांकडे पैसा नाही. मग ही झालेली वसुली खरी की दाखविण्यापुरती आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

पाणीपट्टी वसुली 76 टक्‍के 
जिल्ह्यासह राज्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती यंदाचीच नाही, तर गतवर्षीही होती. गेल्या वर्षी टंचाई आरखड्यांतर्गत जुलैपर्यंत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. शिवाय, पावसाळाही चांगला झाला नसल्याने पाण्याची समस्या डिसेंबरपासूनच जाणवत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या वर्षभर जाणवत होती. अशा स्थितीत 76.77 टक्‍के पाणीपट्टी करवसुली झाली आहे. मार्चमध्ये चार कोटी 6 लाख 13 हजार इतकी वसुली झाली असून, वर्षभरात ही वसुली 24 कोटी 60 लाख 33 हजार झाली आहे. तर घरपट्टी वसुली एकूण उद्दीष्टाच्या तुलनेत 76.41 टक्‍के म्हणजेच 24 कोटी 26 लाख 33 हजार झाली आहे. 

ग्रामपंचायत करवसुली 
कर............उद्दीष्ट...................वसुली.....................टक्‍केवारी 
पाणीपट्टी......32,04,63,000....24,60,33,000.......76.77 टक्‍के 
घरपट्टी.......31,75,06,000.....24,26,00000........76.41 टक्‍के 
व्यापारी गाळे....82, 56,000......59,04,000............71.51 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com