पिकांच्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे करा : सहकार राज्यमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

जळगाव : चक्रीवादळ व पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत करा, असे आदेश सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी तालुक्‍यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. 

जळगाव : चक्रीवादळ व पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत करा, असे आदेश सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी तालुक्‍यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. 
जळगाव तालुक्‍यातील किनोद, भोकर, पळासोड, नांद्रा, नांदगाव, पिलखेडे, सावखेडा व भादली परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकाऱ्यांसमोरच संबंधित अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याबाबत तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावेळी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील शेतकऱ्यांनी हेक्‍टरी 60 हजार रुपये नुकसानभरपाईची यावेळी मागणी केली. त्यावर श्री. पाटील यांनी मदतीचे आश्‍वासन देऊन पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. 
माजी सभापती राजेंद्र चव्हाण, कमलाकर पाटील, किशोर आगीवले, बालशेठ योगेश लाठी, प्रमोद सोनवणे, रघुनाथ पवार, गजानन सोनवणे, भरत पाटील, शुभम पाटील, संदीप पाटील, प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह प्रांताधिकारी तथा रोहयो उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी एल. व्ही. तळेले, गटविकास अधिकारी एस. पी. सोनवणे, एम. जी. जंगले, विस्तार अधिकारी एम. डी. ढाके, सर्कल, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व महसूल व कृषीचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon gulabrao patil pik panchname